RCB Vs CSK Match Highlights X (Twitter)
Sports

IPL 2025 : 'डोसा.. इडली.. सांबर.. चटणी..' CSK च्या डिजेने उडवली RCB च्या खेळाडूची खिल्ली, ट्रोलिंग मागचं नेमकं कारण काय?

RCB Vs CSK Match Highlights : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना काल खेळला गेला. या सामन्यामध्ये आरसीबीचा खेळाडू बाद झाल्यावर चेपॉक स्टेडियममधील डीजेने 'डोसा.. इडली.. सांबर.. चटणी..' हे गाणं लावले.

Yash Shirke

RCB Vs CSK Highlights : चेन्नईच्या एमपी चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएल २०२५ मधला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये आरसीबीने ५० धावांनी सीएसकेवर विजय मिळवला. या सामन्यादरम्यान बंगळुरूचा विकेटकिपर बॅट्समन जितेश शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

शेवटच्या ओव्हरमध्ये जितेश शर्मा फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरला. त्याने ६ बॉल्समध्ये १२ धावा केल्या. सतराव्या ओव्हरमध्ये खलिल अहमदच्या बॉलवर तो बाद झाला. तो ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना चेपॉक स्टेडियममधील डिजेने डोसा इडली सांबर चटणी हे व्हायरल गाणं लावून जितेशला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

जितेशला ट्रोल का करण्यात आले?

आरसीबीच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. त्यामध्ये बंगळुरूच्या खेळाडूंना सीएसकेबद्दल काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. पण जितेश शर्माने सीएसकेला उद्देशून 'डोसा.. इडली.. सांबर.. चटणी..' असे म्हटले होते. या प्रतिक्रियेवरुन जितेशला सीएसकेच्या फॅन्स ट्रोल करायला सुरुवात केली होती.

सामन्यात काय घडलं?

बंगळुरूसाठी कर्णधार रजत पाटीदारने सर्वाधिक ५१ धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला फिल सॉल्ट, विराट कोहली आणि देवदत्त पडिकलची चांगली साथ मिळाली. पहिल्या डावात खेळताना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ७ गडी गमावून १९६ धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांमध्ये नूर अहमदने ३ तर पाथिराणाने २ विकेट्स घेतल्या.

१९७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी चेन्नईचे खेळाडू मैदानात उतरले. सलामीवीर रचिन रवींद्रने काही काळ टिकून खेळ केला, मात्र दुसऱ्या बाजूला सीएसकेच्या मधल्या फळीतले फलंदाज लागोपाठ बाद झाले. रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी संघ सावरण्याचा प्रयत्न केला, पण बंगळुरूच्या प्रभावी गोलंदाजीसमोर चेन्नईच्या फलंदाजांना टिकाव धरता आला नाही. अखेरीस, चेन्नईने २० षटकांत फक्त १४६ धावा केल्या आणि सामना गमावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

Pune News: पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेनने दिली धडक

Maharashtra Live News Update: पत्नीच्या हत्ये प्रकरणातील कैद्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातील घटना

Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

Pune Tourism : मित्रांची साथ अन् बाईक राइड, वीकेंडला पाहा पुण्यातील 'हा' मनमोहक धबधबा

SCROLL FOR NEXT