RCB Coach: जवळचा मित्र बनला विराटचा 'गुरु', RCBला पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी करणार मदत
RCB Team  yandex
क्रीडा | T20 WC

RCB Coach: जवळचा मित्र बनला विराटचा 'गुरु', RCBला पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी करणार मदत

Ankush Dhavre

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकही जेतेपद जिंकू न शकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतला आहे. या संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आणि आता या संघाला प्रशिक्षण देताना दिसून येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील आक्रमक फलंदाज दिनेश कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून आपला शेवटचा सामना खेळला. रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडताच त्याने आयपीएल स्पर्धेला रामराम ठोकला. मात्र आता तो या संघासाठी नव्या भूमिकेत दिसून येणार आहे. दिनेश कार्तिकची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. या पोस्टवर कॅप्शन म्हणून, 'दिनेश कार्तिक नव्या रुपात आरबीमध्ये परतला आहे. डीके आरसीबीच्या पुरुषांच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असणार आहे.'

दिनेश कार्तिकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून केली होती. त्यानंतर त्याने पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि पुन्हा एकदा दिल्लीचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर २०१५ मध्ये त्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात समावेश करण्यात आला. त्यानंतर त्याने कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात लायन्स संघाचं प्रतिनिधित्व केलं. दरम्यान २०२२ मध्ये त्याने पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात कमबॅक केलं. याच संघाकडून खेळताना त्याने २०२४ मध्ये निवृत्तीची घोषणा केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Weight Gain Tips: वजन वाढवायचंय? 'या' गोष्टी करुन 30 दिवसात व्हा 'वजनदार' माणूस

Mumbai Rain: ठाण्यात पावसाचा रेल्वे सेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या

SCROLL FOR NEXT