IPL RR vs RCB Eliminator : RCBचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नं भंगलं! परागच्या 'रॉयल' खेळीनं राजस्थानचा शानदार विजय

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Eliminator : राजस्थान रॉयलच्या रियान पराग आणि यशस्वी जयस्वाल यांच्या आक्रमक खेळीमुळे रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळुरूचं २०२४ ची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे.
IPL RR vs RCB Eliminator
IPL RR vs RCB EliminatorSaam Digital
Published On

राजस्थान रॉयलच्या रियान पराग आणि यशस्वी जयस्वाल यांच्या आक्रमक खेळीमुळे रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळुरूचं २०२४ ची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. मागच्या सामन्यात बेंगळुरूने चेन्नईला रोखत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र सेंकड क्वालिफार सामन्यात राजस्थाने बेंगळुरुला रोखलं. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा रोमहर्षक सामना झाला. शिमरॉन हेटमायर आणि रियान पराग याच्या भागीदारीने राजस्थान रॉयल्स संघाला ४ विकेट्सनी मोठा विजय मिळवून दिला आहे. 24 मे ला राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ २६ मे रोजी अंतिम फेरीत केकेआरशी भिडणार आहे.

दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ गडी गमावून १७२ धावांचं लक्ष्य राजस्थानसमोर ठेवलं होत. यात रजत पाटीदार ३४, लोमरोर ३२, तर विराट कोहलीच्या ३३ धावांचं योगदान राहिलं. राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने ३ विकेट घेतल्या. तर रविंचंद्रन अश्विनने २ फलंदाजांना तंबूत धाडलं आणि बेंगळुरूला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने मधल्या षटकांमध्ये काही विकेट्स गमावल्या मात्र अंतिमक्षणी सामन्यावर आपलं नाव कोरलं.

राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि कोहलर कॅडमोरने संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. त्यानंतर रियान पराग आणि हेटमायरने ग्रीनच्या गोलंदाजीवर चांगलेच फटके मारले. त्यामुले सामना राजस्थानच्या बाजूने झुकला आणि संघाला विजय मिळवून दिला. यशस्वी जैस्वालने ४५ रियान परागने ३६ आणि सिमरन हेटमायरने २६ धावांची संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

IPL RR vs RCB Eliminator
IPL RR vs RCB Eliminator: रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचं राजस्थानसमोर १७३ धावांचे चॅलेंज

बेंगळुरूने राजस्थानचा संघ १५७ धावांवर असताना रियान पराग बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर १६० धावांवर हेटमायरला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. रोव्हमन पॉवेलने राजस्थान संघाला विजयापर्यंत पोहोचवलं. त्याने ८ चेंडूत १६ धावांची नाबाद खेळी केली. बेंगळुरूकडून मोहम्मद सिराजने २ तर लॉकी फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनी १-१ विकेट घेतली, मात्र संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

IPL RR vs RCB Eliminator
KKR vs SRH Qualifier 1: लाईव्ह सामन्यात शाहरुख खानकडून मोठी चूक! मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com