भारताचा कर्णधार रोहित शर्मा, ऑस्ट्रेलियाला घरात घूसून कसोटी मालिका हरवणारा कर्णधार अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वाल हे भारताचे स्टार खेळाडू रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते.
मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर मुंबई विरुद्ध जम्मू- काश्मीर असा सामना रंगला. या सामन्यात जम्मू- काश्मीरच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आणि घरच्या मैदानावर खेळताना मुंबईला पाणी पाजलं. जम्मू- काश्मीरने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला.
या सामन्यात जम्मू- काश्मीरने मुंबईसमोर जिंकण्यासाठी २०५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना जम्मू- काश्मीरच्या फलंदाजांनी आधी संयम ठेवून फलंदाजी केली. त्यानंतर फलंदाजांनी ४ च्या सरासरीने धावा केल्या आणि ४९ व्या षटकात सामना जिंकला. या धावांचा पाठलाग करताना, विवरांत शर्माने ३८ धावांची खेळी केली. तर आबिद मुश्ताकने ३२ धावा केल्या.
या सामन्यातील पहिल्या डावात मुंबईचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. मुंबईचा डाव अवघ्या १२० धावांवर आटोपला. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या जम्मू- काश्मीरच्या फलंदाजांनी २०६ धावा करत ८६ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही मुंबईचा डाव कोलमडला होता.
मात्र शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियानने मिळून मुंबईचा डाव सांभाळला. दोघांनी शतक आणि अर्धशतक झळकावत १८४ धावांची भागीदारी केली. या डावात फलंदाजी करताना शार्दुलने ११९ धावांची खेळी केली. तर तनुष कोटीयानने ६२ धावा चोपल्या.
जम्मू- काश्मीरला हा सामना जिंकण्यासाठी २०५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या जम्मू- काश्मीरकडून शुभमन खजूरियाने ४५, यावेर खानने २४, विवरांच शर्माने ३८, अब्दुल समदने २४ आणि शेवटी आबिद मुश्ताकने ३२ आणि कन्हैय्याने १९ धावांची खेळी करत जम्मू- काश्मीरला मोठा विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.