
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी -२० सामन्यात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला.
या सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी १३३ धावांचं आव्हान होतं. हे आव्हान भारतीय संघाने सहज पूर्ण केलं. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मात्र या सामन्यात मोहम्मद शमी खेळताना दिसून आला नव्हता.
भारतीय संघाने हा सामना ७ गडी राखून जिंकला. दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मोहम्मद शमीबाबत वक्तव्य केलं. त म्हणाला, ' संघात अनुभवी गोलंदाज असणं अतिशय गरजेचं आहे.आम्हाला आमच्या मजबूत बाजूसह मैदानात उतरायचं होतं. याआधीही आम्ही दक्षिण आफ्रिकेत हेच केलं होतं. वेगवान गोलंदाजी करण्याची जबाबदारी हार्दिक पंड्याने आपल्या खांद्यावर घेतली. त्यामुळे मला अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवण्याची संधी मिळाली.'
मोहम्मद शमी भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला गेली १४ महिने संघाबाहेर राहावं लागलं होतं. आता त्याने टी -२० संघातून कमबॅक केलं आहे. मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला २० षटक अखेर १३२ धावा करता आल्या. इंग्लंडकडून जोस बटलरने अर्धशतकी खेळी केली. तर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने शानदार अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.