Ranji Trophy: गुजरातचा बॉलर चमकला! एकाच डावात घेतल्या तब्बल ९ विकेट्स

Siddharth Desai: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील गुजरात विरुद्ध उत्तराखंड यांच्यात झालेल्या सामन्यात सिद्धार्थ देसाईने दमदार कामगिरी केली आहे.
Ranji Trophy: गुजरातचा बॉलर चमकला! एकाच डावात घेतल्या तब्बल ९ विकेट्स
siddharth desaitwitter
Published On

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. एकीकडे भारतीय संघातील स्टार खेळाडू रणजी खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे युवा खेळाडूने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गुजरातकडून खेळत असलेला फिरकीपटू सिद्धार्थ देसाईने उत्तराखंडविरुद्ध झालेल्या सामन्यात ९ गडी बाद करून कमाल कामगिरी करून दाखवली आहे. यासह गुजरातसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर झाला आहे.

सिद्धार्थच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने पहिल्या डावात १५ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने २.४० च्या इकोनॉमिने ३६ धावा खर्च करत ९ गडी बाद केले. गुजरातसाठी अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही गोलंदाजाला असा कारनामा करता आला नव्हता. यापूर्वी गुजरातचा गोलंदाज राकेश विनूभाईने २०१२ मध्ये गोलंदाजी करताना ३१ धावा खर्च करत ८ गडी बाद केले होते.

Ranji Trophy: गुजरातचा बॉलर चमकला! एकाच डावात घेतल्या तब्बल ९ विकेट्स
IND vs ENG: गुरु तसा शिष्य! अभिषेकने मोठ्या रेकॉर्डमध्ये युवराज सिंगची केली बरोबरी

ही गुजरातसाठी केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. तर एकूण रणजी ट्रॉफी स्पर्धेत एकाच डावात केलेली तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एकाच डावात चांगली कामगिरी करण्याचा रेकॉर्ड हा हरियाणाचा गोलंदाज अंशुल कंबोजच्या नावावर आहे. त्याच्या नावे एकाच डावात १० गडी बाद करण्याची नोंद आहे. यादरम्यान त्याने अवघ्या ४९ धावा खर्च केल्या होत्या.

Ranji Trophy: गुजरातचा बॉलर चमकला! एकाच डावात घेतल्या तब्बल ९ विकेट्स
IND vs ENG Record: इंग्लंडला नमवताच टीम इंडियाने रचला इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच संघ

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर उत्तराखंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडचा डाव १११ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातने दिवसाखेर ४ गडी बाद १९० धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com