Shubman Gill ने GT समोर ठेवली ही एकच अट; मान्य न केल्यास ऑक्शनमध्ये जाणार

Shubman Gill, Gujarat Titans News In Marathi: शुभमन गिलने गुजरात टायटन्ससमोर अट ठेवली आहे.
Shubman Gill ने GT समोर ठेवली ही एकच अट; मान्य न केल्यास ऑक्शनमध्ये जाणार
shubman gill statement after csk vs gt ipl match chennai super kings vs gujarat titanstwitter
Published On

IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्स संघाची साथ सोडली होती. त्याने मुंबई इंडियन्स संघात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.

हार्दिक गेल्यानंतर शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना गुजरातला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आगामी हंगामापूर्वी गुजरातचा कर्णधार बदलणार असल्याची चर्चा सुरु आहे.

हा खेळाडू होणार कर्णधार?

गुजरातने जर शुभमन गिलला कर्णधारपदावरुन काढलं, तर ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी या संघात प्रबळ दावेदार आहे. राशिद खान २०२२ पासून या संघाकडून खेळतोय. त्याच्याकडे नेतृत्वाचाही चांगलाच अनुभव आहे. अफगाणिस्तान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी राशिद खानकडे आहे. त्यामुळे गुजरातने जर कर्णधार बदलला, तर ही जबाबदारी राशिद खानकडे सोपवली जाऊ शकते.

Shubman Gill ने GT समोर ठेवली ही एकच अट; मान्य न केल्यास ऑक्शनमध्ये जाणार
IND vs NZ: KL Rahul खेळणार! हेड कोच गंभीरकडून पाठराखण; टीका करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

शुभमन गिल गुजरातची साथ सोडणार?

असं म्हटलं जातंय की,गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या क्रमांकावर म्हणजे १८ कोटी रुपये देण्यासाठी राशिद खानला रिटेन करु शकतो. असं झाल्यास शुभमन गिल ऑक्शनमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. जर शुभमन गिल ऑक्शनमध्ये आला, तर त्याच्यावर रेकॉर्डब्रेक बोली लागू शकते. मात्र गुजरात टायटन्सचा संघ त्याला जाऊ देण्याची शक्यता खूप कमी आहे.

Shubman Gill ने GT समोर ठेवली ही एकच अट; मान्य न केल्यास ऑक्शनमध्ये जाणार
IND vs NZ: सतत संधी मिळूनही ठरतोय फ्लॉप! रोहित या स्टार खेळाडूला बसवणार

कर्णधार म्हणून फ्लॉप, फलंदाज म्हणून हिट

गेल्या हंगामात त्याला कर्णधार म्हणून हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र फलंदाजीत त्याने चांगली कामगिरी केली होती. या हंगामात १ शतक आणि २ अर्धशतकांच्या बळावर त्याने ४२६ धावा केल्या होत्या. यापू्र्वी २०२३ मध्ये झालेल्या हंगामात त्याने ८९० धावा कुटल्या होत्या. या हंगामात त्याने ३ शतकं झळकावली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com