Maharaja T20 league: महाराजा लिगमध्ये GT च्या फलंदाजाचा राडा! 507 धावांसह खेचले 52 षटकार; IPL मध्ये होणार मालामाल

Abhinav Manohar In Maharaja Premier League 2024: गुजरात टायटन्स संघातील युवा फलंदाज अभिनव मनोहरने महाराजा प्रिमियर लिगमध्ये तुफान फलंदाजी केली आहे.
Maharaja T20 league: महाराजा लिगमध्ये GT च्या फलंदाजाचा राडा! 507 धावांसह खेचले 52 षटकार; IPL मध्ये होणार मालामाल
abhinav manohartwitter
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावात अनेक स्टार खेळाडू दुसऱ्या संघात जातील. तर काही स्टार खेळाडू आपल्या आवडत्या संघातून खेळताना दिसून येऊ शकतात. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने आयपीएल फ्रेंचायझींच्या मालकांसोबत एका बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत काही नियम बदलण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत किती खेळाडूंना रिटेन करता येणार हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. येत्या काही दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान लिलावापूर्वी एक फलंदाज तुफान चर्चेत आहे. ज्याने महाराजा टी-२० लीग स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. या खेळाडूंवर मेगा लिलावात पैशांचा पाऊस पाडला जाऊ शकतो.

या फलंदाजांवर लागणार मोठी बोली

आम्ही बोलतोय, गुजरात टायटन्स संघातील फलंदाज अभिनव मनोहरबद्दल. युवा फलंदाज अभिनव मनोहरला २०२२ मध्ये झालेल्या लिलावात गुजरात टायटन्सने २.६० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं.

मात्र यादरम्यान त्याला आपली छाप सोडता आली नव्हती. त्याने १९ सामन्यांमध्ये अवघ्या २३१ धावा केल्या होत्या. त्यामुळे गुजरातचा संघ त्याला रिलीज करणार हे जवळजवळ निश्चित होतं. मात्र त्याने गुजरात टायटन्स संघाच्या टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढवलं आहे. त्याने कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या महाराजा ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे.

Maharaja T20 league: महाराजा लिगमध्ये GT च्या फलंदाजाचा राडा! 507 धावांसह खेचले 52 षटकार; IPL मध्ये होणार मालामाल
Maharaja T20 League: भारताचा नवा हिटमॅन! पठ्ठ्याने 1,2 नव्हे तर खेचले तब्बल 36 षटकार

महाराजा ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या आणि सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत अभिनव मनोहर अव्वल स्थानी आहे. त्याने या स्पर्धेत खेळलेल्या १० सामन्यांमध्ये ५०७ धावा चोपल्या आहेत.

या धावा त्याने १९६.५१ च्या सरासरीने केल्या आहेत. यादरम्यान या फलंदाजाने ४५ षटकार खेचले आहेत. ९ पैकी ५ सामन्यांमध्ये या फलंदाजाने ५ अर्धशतकं झळकावली आहेत. तर नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

या शानदार कामगिरीसह त्याने गुजरात टायटन्स संघाला नक्कीच विचार करायला भाग पाडलं आहे. या युवा खेळाडूला जर गुजरात टायटन्सने रिलीज केलं, तर इतर संघ त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मोठी बोली लावू शकतात.

Maharaja T20 league: महाराजा लिगमध्ये GT च्या फलंदाजाचा राडा! 507 धावांसह खेचले 52 षटकार; IPL मध्ये होणार मालामाल
Maharaja T20 League: टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडला! १,२ नव्हे तर ३ सुपर ओव्हरनंतर लागला सामन्याचा निकाल -VIDEO

शिवमोगा लायन्स आणि गुलबर्गा मिस्टिक्स यांच्यात झालेल्या सामन्यात अभिनव मनोहरने शानदार ७६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ९ षटकार खेचले. तर रोहन नवीनने नाबाद ३६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर शिवमोगा लायन्सने २०६ धावांचं आव्हान पूर्ण केलं. या शानदार विजयासह हा संघ अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीत कायम आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com