Maharaja T20 League: टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडला! १,२ नव्हे तर ३ सुपर ओव्हरनंतर लागला सामन्याचा निकाल -VIDEO
SUPER OVERtwitter

Maharaja T20 League: टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडला! १,२ नव्हे तर ३ सुपर ओव्हरनंतर लागला सामन्याचा निकाल -VIDEO

Three Super Overs In T20 Cricket: महाराजा टी-२० क्रिकेट लीग स्पर्धेत इतिहास घडला आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात १,२ नव्हे तर ३ सुपर ओव्हरनंतर सामन्याचा निकाल लागला आहे.
Published on

सध्या महाराजा टी -२० ट्रॉफीची जोरदार चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड देखील याच स्पर्धेत खेळताना दिसून येतोय.

या स्पर्धेतील १७ व्या सामन्यात बंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात फुल ऑन एंटरटेनमेंट पाहायला मिळालं आहे.

कारण या टी -२० सामन्याचा निकाल, १,२ नव्हे तर तिसऱ्यांदा झालेल्या सुपर ओव्हरनंतर लागला आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय, की कुठल्याही सामन्याचा निकाल हा तिसऱ्यांदा झालेल्या सुपर ओव्हरनंतर लागला आहे.

एकाच सामन्यात ३ सुपर ओव्हर

टी -२० क्रिकेटमध्ये सामना बरोबरीत सुटला, की निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली जाते. या ओव्हरमध्येही निकाल लागला नाहीतर मग पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवली जाते. या सामन्यात हुबळी टायगर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना या संघाला १६४ धावा करता आल्या. यादरम्यान संघाचा कर्णधार मनीष पांडेने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली.

Maharaja T20 League: टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडला! १,२ नव्हे तर ३ सुपर ओव्हरनंतर लागला सामन्याचा निकाल -VIDEO
Maharaja T20 League: 48 चेंडूत 124 धावा..टीम इंडियातून बाहेर असलेल्या फलंदाजाने घातला राडा!

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगळुरू संघाला ९ गडी बाद १६४ धावा करता आल्या. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हरचा थरार रंगला.

बंगळुरू संघाने सुपर ओव्हरमध्ये १० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्याासाठी आलेल्या हुबळी संघालाही १० धावा करता आल्या. सामन्यातील दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये हुबळीने केलेल्या ८ धावांचा पाठलाग करतानाही बंगळुरुला ८ धावा करता आल्या.

Maharaja T20 League: टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडला! १,२ नव्हे तर ३ सुपर ओव्हरनंतर लागला सामन्याचा निकाल -VIDEO
Team India News: बांगलादेशची खैर नाय! शमी,बुमराहपेक्षाही खतरनाक गोलंदाज कमबॅकसाठी सज्ज

त्यामुळे सामना तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये गेला. तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बंगळुरुने संघाची धावसंख्या १२ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करताना हुबळी संघाने १३ धावा करत हा सामना आपल्या नावावर केला. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या सामन्याचा निकाल हा ३ वेळेस सुपर ओव्हर झाल्यानंतर लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com