T20 World Cup 2024 Venue: टी-२० वर्ल्डकपबाबत ICC चा मोठा निर्णय; बांगलादेश नाही तर आता 'या' देशात होणार सामने

ICC Woemen's T20 World Cup 2024 Venue: येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये महिला टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. दरम्यान या वर्ल्डकपबाबत आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
women's t20 world cup
women's t20 world cupICC
Published On

Woemen's T20 World Cup 2024: आयसीसीने महिला टी-२० वर्ल्डकपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशामध्ये आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपचं आयोजन होणार होतं. मात्र सध्या बांगलादेशातील परिस्थिती पाहता आयसीसीने वर्ल्डकपचं ठिकाण बदण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसीच्या वेबसाईटवर दिलेल्या रिपोर्टमुळे हे कन्फर्म झालं आहे की, बांगलादेशामध्ये होणारा महिला टी-२० वर्ल्डकप आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला जाणार आहे.

women's t20 world cup
Jaydev Unadkat: 400 विकेट्स घेऊनही Duleep Trophy तून वगळलं; स्टार गोलंदाज आता इंग्लंडमध्ये खेळणार!

आयसीसीच्या रिपोर्टमध्ये काय नमूद करण्यात आलंय?

आयसीसीने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलंय की, महिला टी-२० वर्ल्डकपचं ९ वं एडिशन आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवलं जाणार आहे. मात्र टूर्नामेंटच्या आयोजनाचे हक्क बांगलादेशाकडेच राहणार आहेत. ३ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार असून ३० ऑक्टोबर रोजी याची फायनल रंगणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये वर्ल्डकपचं आयोजन केलं असून दुबई आणि शारजाहमध्ये सामने होणार आहेत.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ एलार्डिस यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, बांगलादेशामध्ये महिला टी-२० वर्ल्डकप होस्ट न होणं ही एक लज्जास्पद गोष्ट आहे. पण आम्हाला माहितीये की, बांगलादेशाने वर्ल्डकपच्या आयोजनाची एक चांगली तयारी केली असेल. परंतु, अनेक सहभागी टीमच्या सरकारांनी बांगलादेशला जाण्याबाबत चिंता व्यक्त केली, त्यामुळे हे शक्य होऊ शकलं नाही.

women's t20 world cup
Gautam Gambhir ने निवडली ग्रेट प्लेइंग 11! भारताचा एकही खेळाडू नाही, पण पाकिस्तानच्या तिघांची निवड

ज्योफ एलार्डिस पुढे म्हणाले की, बांगलादेशमध्ये हा वर्ल्डकप आयोजित करण्यासाठी प्रत्येक संभाव्य मार्ग शोधल्याबद्दल मी बांगलादेश क्रिकेट बोर्ड टीमचे आभार मानतो. आम्ही भविष्यात बांगलादेशमध्ये ICC जागतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास उत्सुक आहोत

बांगलादेशामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोध होताना दिसला. यामुळे या आंदोलनात बांगलादेशामध्ये सत्तापालट पहायला मिळाला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडून पळ काढल्याचंही पाहायाला मिळालं. दरम्यान आता देशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com