Maharaja T20 League: भारताचा नवा हिटमॅन! पठ्ठ्याने 1,2 नव्हे तर खेचले तब्बल 36 षटकार

Abhinav Manohar Sixes In Maharaja T20 League: महाराजा टी-२० लीग स्पर्धेत युवा फलंदाज अभिनव मनोहरने तब्बल ३६ षटकार खेचले आहेत.
Maharaja T20 League: भारताचा नवा हिटमॅन! पठ्ठ्याने 1,2 नव्हे तर खेचले तब्बल 36 षटकार
abhinav Poorantwitter
Published On

बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या महाराजा टी-२० लीग स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत एका फलंदाजाने एक,दोन, तीन नव्हे, तर तब्बल ३६ षटकार खेचले आहेत. या स्पर्धेतील काही संघांनी मिळून जितके षटकार मारले नाहीत,तितके षटकार या एका फलंदाजाने मारले आहेत. या फलंदाजाला भारताचा पुढील हिटमॅन असं म्हटलं जाऊ लागलं आहे. दरम्यान कोण आहे हा फलंदाज आणि काय केलाय रेकॉर्ड?जाणून घ्या.

Maharaja T20 League: भारताचा नवा हिटमॅन! पठ्ठ्याने 1,2 नव्हे तर खेचले तब्बल 36 षटकार
Maharaja T20 League: टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडला! १,२ नव्हे तर ३ सुपर ओव्हरनंतर लागला सामन्याचा निकाल -VIDEO

महाराजा टी-२० लीग स्पर्धेत खेळताना युवा फलंदाज अभिनव मनोहरने (Abhinav Manohar) चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. या फलंदाजाने एकट्याने ३६ षटकार खेचले आहेत. गेल्या हंगामातील रेकॉर्ड पाहिला, तर एका फलंदाजाने संपूर्ण हंगामात सर्वाधिक ३२ षटकार मारले होते. मात्र अभिनव मनोहरने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये ३२ षटकार खेचले आहेत. त्यामुळे त्याला हा आकडा आणखी वाढवण्याची संधी असणार आहे.

Maharaja T20 League: भारताचा नवा हिटमॅन! पठ्ठ्याने 1,2 नव्हे तर खेचले तब्बल 36 षटकार
Maharaja T20 League: 48 चेंडूत 124 धावा..टीम इंडियातून बाहेर असलेल्या फलंदाजाने घातला राडा!

महाराजा टी-२० लीग स्पर्धेत प्रत्येक संघाला साखळी फेरीत १०-१० सामने खेळण्याची संधी मिळते. अभिनव मनोहर या स्पर्धेत शिवामोगा लायन्स संघाकडून खेळतो. या संघाला आणखी २ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. जर या संघाने सेमीफायनल आणि फायनलमध्ये प्रवेश केला, तर आणखी २ म्हणजेच ४ सामने खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे हा आकडा ५० च्याही पुढे जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

अभिनव मनोहर अव्वल स्थानी

या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत अभिनव मनोहर अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत ३६ षटकार खेचले आहेत. तर सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी असलेल्या करुण नायरने आतापर्यंत १८ षटकार खेचले आहेत. तर या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या मनोज भादांगेने १७ षटकार खेचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com