rajat patidar vs sarfaraz khan saam tv news
Sports

IND vs ENG 2nd Test: रजत पाटीदार की सरफराज खान? कोणाला मिळणार स्थान? बॅटिंग कोचने कोडं सोडवलं

Sarfaraz Khan vs Rajat Patidar: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कोणााला संधी मिळणार, यावर फलंदाजी प्रशिक्षकांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Sarfaraz Khan vs Rajat Patidar:

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत पाहुण्यांनी यजमान भारतीय संघाचा चांगलाच समाचार घेतला.

तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठे धक्के बसले आहेत. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

विराट कोहली बाहेर झाल्यानंतर रजत पाटीदारला संघात स्थान दिलं गेलं. त्यानंतर केएल राहुल बाहेर झाल्यानंतर सरफराज खानला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. दरम्यान या दोन्ही फलंदाजांपैकी कोणाचं नशीब फळफळणार? याचं उत्तर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दिलं आहे.

काय म्हणाले विक्रम राठोड?

विक्रम राठोड म्हणाले की, ' रजत पाटीदार आणि सरफराज खानपैकी एकाची निवड करणं मुळीच सोपं नसेल. दोघेही उत्कृष्ठ खेळाडू आहेत. त्या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे, हे आपण पाहिलच आहे. माझं असं म्हणणं आहे की, दोघेही फलंदाज या खेळपट्टीवर एक्स फॅक्टर ठरू शकतात. मात्र दोघांपैकी एकाला निवडायचं असेल तर हे मुळीच सोपं नसेल.' (Cricket news in marathi)

तसेच ते पुढे म्हणाले की, ' सरफराज खान की रजत पाटीदार दोघांपैकी कोणाला निवडायचं हे रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ठरवतील. परिस्थिती पाहून संघाची निवड केली जाईल. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र पहिल्याच दिवसापासून मदत मिळणं जरा कठीण आहे. सरफराज खान फिरकी गोलंदाजी चांगलीच खेळून काढतो. आता दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT