Rahul Dravid with Jay Shah Twitter
Sports

Rahul Dravid Refused Money: क्रिकेटचा खरा 'जेंटलमन'! बक्षीस म्हणून मिळणारी तब्बल इतक्या कोटींची रक्कम राहुल द्रविडने नाकारली

Rahul Dravid Refused Prize Money: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बीसीसीआयकडून मिळणारी रक्कम राहुल द्रविडने नाकारली आहे.

Ankush Dhavre

शांत, संयमी आणि क्रिकेटचा जेंटलमन खेळाडूचं जिवंत उदाहरण म्हणजे भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड. भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात राहुल द्रविड यांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय संघाला गेल्या ११ वर्षांपासून आयसीसीची ट्रॉफी उंचावता आली नव्हती. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने करुन दाखवलं.

हा विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघासाठी १२५ कोटींचे बक्षीस जाहीर केले. यानुसार, भारतीय संघातील ११ खेळाडूंना आणि राहुल द्रविड यांना प्रत्येकी ५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान राहुल द्रविड यांनी बक्षीसातील ५० टक्के रक्कम नाकारली आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या १२५ कोटींची विभागणी ही, खेळाडू, राखीव खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांमध्ये विभागली जाणार आहे. संघातील खेळाडूंसह राहुल द्रविड यांना देखील ५ कोटी मिळणार आहेत. तर इतर प्रशिक्षकांना २.५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान राहुल द्रविड यांनी इतर प्रशिक्षकांप्रमाणे २.५ कोटी घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राहुल द्रविड यांना बोनस म्हणून तितकीच रक्कम हवी आहे, जितकी रक्कम इतर प्रशिक्षकांना दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांनी एकूण रक्कमेतून ४० टक्के रक्कम नाकारली आहे. बीसीसीआयनेही त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

यापूर्वी राहुल द्रविड यांनी २०१८ मध्ये अंडर १९ संघाला प्रशिक्षण दिलं होतं. त्यावेळी पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने अंडर १९ वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. त्यावेळी राहुल द्रविड यांना बोनस म्हणून ५० लाख रुपये दिले जाणार होते. तर इतर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी २० लाख दिले जाणार होते. मात्र राहुल द्रविड यांनी इतरांना मिळणाऱ्या रक्कमेपेक्षा अधिकची रक्कम नाकारली होती. आता दुसऱ्यांदा राहुल द्रविड यांचा मोठेपणा पाहायला मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT