rachin ravindra trolled by dhoni fans X (Twitter)
Sports

Rachin Ravindra : एक सिक्स महागात पडला.. धोनीच्या चाहत्यांमुळे रचिन रवींद्र होतोय ट्रोल; 'थालाकडे स्टाईक..'

Rachin Ravindra MS Dhoni : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स महामुकाबल्यामध्ये चेन्नईचा विजय झाला. या विजयात रचिन रवींद्रचा मोलाचा वाटा होता. पण तरीही धोनीचे चाहते रचिनला ट्रोल करत आहेत.

Yash Shirke

MI VS CSK Highlights : चेन्नई सुपर किंग्सने काल मुंबई इंडियन्सचा ४ गडी राखून पराभव केला. सामन्यात रचिन रवींद्रने नाबाद ६५ धावांची खेळी केली. सलामीसाठी आलेला रचिन शेवटपर्यंत मैदानात टिकून होता, सीएसकेकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या. चांगला खेळ करुनही चाहते रचिन रवींद्रला ट्रोल करत आहेत. या ट्रोलिंगचे कारण एमएस धोनी आहे असे म्हटले जात आहे.

कालच्या सामन्यात जेव्हा विजयासाठी ४ धावा शिल्लक होत्या तेव्हा महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला. अठराव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर रविंद्र जडेजा रनआउट झाला. दीपक चहरच्या अचूक आणि वेगवान थ्रोमुळे जडेजाला माघारी परतावे लागले. त्यानंतर फलंदाजीसाठी एमएस धोनी आला. त्याच्या आगमनाने संपूर्ण स्टेडियम आनंदाने जल्लोषात दणाणून गेले.

महेंद्रसिंह धोनीने अठराव्या ओव्हरचे शेवटचे दोन डॉट बॉल खेळले. पुढे एकोणविसाव्या ओव्हरमध्ये स्ट्राईक रचिन रवींद्रकडे आली. पहिल्याच बॉलमध्ये त्याने जोरदार षटकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला. या एका सिक्समुळे रचिन रवींद्रला ट्रोल केले जात आहे. रचिनने स्टाईक धोनीला द्यायला हवी होती. धोनीने मॅच संपवायला हवी होती, असे अनेक चाहते म्हणत आहेत.

'रचिन रवींद्रने एक धाव काढून धोनीला स्टाईक द्यायला हवी होती', 'त्याने सिक्स मारलाच का?' 'रचिनमुळे माहीला खेळता आले नाही', असे म्हणत धोनीच्या काही चाहत्यांनी रचिन रवींद्रला ट्रोल केले आहे. अभद्र शब्द वापरुन काहींनी रचिनला शिव्या देखील घातल्या. थालाच्या फॅन्समुळे रचिन वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT