MS Dhoni Vighnesh Puthur : रिक्षाचालकाचा मुलगा IPL मध्ये चमकला, खुद्द महेंद्रसिंह धोनीनंही केलं कौतुक; माहीसोबतचे फोटो व्हायरल

MI vs CSK IPL 2025: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात सीएसकेने ४ गडी राखून विजय मिळवला. मात्र, या सामन्यात सर्वाधिक चर्चा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरलेल्या विग्नेश पुथुरची होत आहे.
MS Dhoni Vighnesh Puthur
MS Dhoni Vighnesh PuthurX (Twitter)
Published On

MI VS CSK : विग्नेश पुथुर आयपीएलच्या पहिल्याच सामन्यामध्ये चमकला आहे. मुंबई-चेन्नईमधील खेळाडूंसह महेंद्रसिंह धोनीने देखील त्याचे कौतुक केले. धोनी आणि विग्नेशचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्या दोघांमध्ये संवाद झाल्याचे पाहायला मिळते. स्वप्न पूर्ण झाल्याचे भाव विग्नेशच्या चेहऱ्यावर असल्याचे फोटोमधून दिसते.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून विग्नेश पुथुरला खेळवण्यात आले. या सामन्यातून विग्नेशने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुडा यांना बाद केले. पदार्पणातल्या पहिल्याच सामन्यामध्ये विग्नेशने लक्षात राहील असा खेळ केला.

सामन्यामध्ये ट्रेंड बोल्ड, मिचेल सँटनर सारख्या गोलंदाजांना विकेट मिळाली नाही पण नवख्या विग्नेशने महत्त्वपूर्ण अशा विकेट्स काढल्या. सातव्या ओव्हरमध्ये विग्नेशने ऋतुराज गायकवाडला, नवव्या ओव्हरमध्ये शिवम दुबेला आणि अकराव्या ओव्हरमध्ये दीपक हुडाला बाद केले. चमकदार कामगिरी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधले.

MS Dhoni Vighnesh Puthur
MS Dhoni MI VS CSK : चाहत्यांनी वर्षभर प्रतिक्षा केली; मात्र 'ती' गोष्ट करायची धोनीकडून राहूनच गेली, काय घडलं?

रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर रायन रिकल्टन आणि विल जॅक्सदेखील लवकर माघारी परतले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी संयमाने खेळत डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि अनुक्रमे २९ आणि ३१ धावा केल्या. ते बाद झाल्यानंतर मुंबईच्या मधल्या फळीची पूर्णपणे पडझड झाली. अशा स्थितीत दीपक चहरने २८ महत्त्वाच्या धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात मदत केली. अखेरीस, मुंबईने २० ओव्हर्समध्ये १५५ धावा केल्या.

MS Dhoni Vighnesh Puthur
MI VS CSK Live Match : चिते की चाल, बाज की नजर और धोनी की स्टंपिंग.. 0.12 सेकंदात सूर्याला केलं बाद, Video व्हायरल

चेस करताना, चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर रचिन रवींद्र शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने अर्धशतकीय खेळी केली. मात्र, काही विकेट्स लवकर गेल्याने सामना काही काळ मुंबईच्या बाजूने झुकल्यासारखा वाटले. अशा परिस्थितीत, रविंद्र जडेजाने झटपट धावा काढून सीएसकेला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. तो बाद झाल्यानंतर, अखेरच्या काही चेंडूंसाठी एमएस धोनी मैदानात उतरला.

MS Dhoni Vighnesh Puthur
MI VS CSK Live IPL 2025 : रोहितचा चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.. पहिल्याच सामन्यात हिटमॅन फेल, Video व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com