
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हा महामुकाबला काल चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला गेला. सामना चेन्नईने जिंकला पण त्यात मुंबई इंडियन्सच्या दीपक चहरची चर्चा झाली. चहरने सामन्यात २८ धावा केल्या. त्याने राहुल त्रिपाठीला बाद केले. तसेच रविंद्र जडेजालाही दीपकने रनआउट केले.
दीपक चहरने कालच्या सामन्यामध्ये बॅट आणि बॉल दोन्ही बाजूंनी चांगला खेळ केला. त्याच दरम्यान दीपकची बहीण मालतीने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीमध्ये कटप्पा, बाहुबली आणि दीपक चहरचा फोटो आहे. मालती चहरने अप्रत्यक्षरित्या दीपकला तू कटप्पा सारखा गद्दार आहेस असे म्हटल्याचा अंदाज लावला जात आहे.
मालती चहरने पोस्ट केलेल्या या इन्स्टा स्टोरीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मागील वर्षांपर्यंत दीपक चहर चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. महेंद्रसिंह धोनीच्या मार्गदर्शनात तो तयार झाला होता. सीएसकेच्या संघातील तो महत्त्वाचा वेगवान गोलंदाज होता. मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईने त्याला गमावले होते.
आयपीएल २०२५ मेगाऑक्शनमध्ये दीपक चहरवर मुंबई आणि चेन्नई या दोन्ही रस्सीखेच सुरु होती. शेवटी मुंबईने सर्वाधिक बोली लावत त्याला संघात सामील केले होते. कालच्या मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यामध्ये दीपकने चेन्नईच्या विरोधात खेळताना दमदार कामगिरी केली. दीपकच्या कालच्या खेळावरुन दीपकला ट्रोल करण्यासाठी त्याच्या बहिणीने स्टोरी पोस्ट केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.