pro kabaddi season 10 final puneri paltan vs haryana steelers final live streaming and match details  saam tv news
Sports

Pro Kabaddi Final: पहिल्या जेतेपदाची आस! पुणेरी पलटण की हरियाणा स्टीलर्स; कोण मारणार मैदान?

Puneri Paltan vs Haryana Steelers: ज्या क्षणाची गेल्या २ महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहीली जात होती तो क्षण अखेर आला आहे. हैदराबादच्या मैदानावर प्रो कबड्डीच्या १० व्या हंगामातील अंतिम सामना रंगणार आहे.

Ankush Dhavre

Puneri Paltan vs Haryana Steelers, Pro Kabaddi Season 10 Final:

ज्या क्षणाची गेल्या २ महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहीली जात होती तो क्षण अखेर आला आहे. हैदराबादच्या मैदानावर प्रो कबड्डीच्या १० व्या हंगामातील अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टीलर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांना प्रो कबड्डीची पहिली ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे. दरम्यान जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही.

अस्लम इनामदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पुणेरी पलटणने सलग दुसऱ्यांदा प्रो कबड्डीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये पुणेरी पलटणने पटना पायरेट्सला ३७-२१ ने पराभूत केलं होतं. गतवर्षी झालेल्या अंतिम सामन्यात पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. मात्र या सामन्यात पुणेरी पलटणला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी पुणेरी पलटणला जेतेपद पटकावण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. (Cricket news in marathi)

इथे पाहा लाईव्ह...

प्रो कबड्डीच्या १० व्या हंगामातील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता रंगणार आहे. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर केले जाणार आहे. यासह हे सामने डिस्नी प्लस हॉटस्टार आणि हॉटस्टारच्या वेबसाईटवर देखील पाहता येणार आहे.

हरियाणा स्टीलर्सचा संघ प्रो कबड्डीच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचला आहे. हरियाणा स्टीलर्सने स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जयपुर पिंक पँथर्स संघाला ३१-२७ ने पराभूत करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT