Pro Kabaddi Semi Final: सेमीफायनलमध्ये पटना पायरेट्सला नमवत पुणेरी पलटणची प्रो कबड्डीच्या फायनलमध्ये धडक

Puneri Paltan vs Patna Pirates: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पटना पायरेट्सला 37-21 असे नमवून पुणेरी पलटण संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
pkl season 10 puneri paltan beat patna pirates to enter in finals of pro kabaddi
pkl season 10 puneri paltan beat patna pirates to enter in finals of pro kabaddi saam tv news
Published On

Puneri Paltan Enters In Final Of PKL Season 10:

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पटना पायरेट्सला 37-21 असे नमवून पुणेरी पलटण संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

ताऊ देवीलाल इंडोर स्टेडियम येथे पार पडलेल्या या लढतीत पुणेरी पलटण संघाकडून कर्णधार अस्लम इनामदारने(7गुण) अष्टपैलू कामगिरी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शुक्रवारी, 1 मार्च रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पुणेरी पलटण संघाशी सामना करणार आहे..

चुरशीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध खेळ केला. सामन्यात बरोबरी असताना पुणेरी पलटन संघाच्या अस्लम इनामदारने दोन गुण मिळवून देताना संघाला आघाडी मिळवून दिली. 6व्या मिनिटाला मोहित गोयतने डू ऑर डाय मध्ये पुणेरी पलटण संघाला गुण मिळवून देत आघाडी वाढवली. त्यानंतर पुणेरी पलटण संघाने पटना संघावर पहिला लोन चढवून 16-10 अशी आघाडी कायम ठेवली. मोहम्मद रेजा शादलुईने बचावात उत्तम कामगिरी करत पुणेरी पलटण संघाला पूर्वार्धात 20-11 अशी आघाडी मिळवून दिली. (Kabaddi News In Marathi)

pkl season 10 puneri paltan beat patna pirates to enter in finals of pro kabaddi
IND vs ENG 5th Test: धरमशालेत रंगणार भारत- इंग्लंड अंतिम कसोटी सामना! इथे कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड?

उत्तरार्धात देखील पुणेरी पलटण संघाने आपले वर्चस्व कायम राखले. पुणेरी पलटण संघाने 26व्या मिनिटाला पटना संघावर दुसरा लोन चढवून 26-13 अशी आघाडी कायम राखली. पटना संघाकडून सचिन व सुधाकर एम यांनी एकाबाजुने लढताना काही गुण मिळवून दिले. पण पुणेरी पलटण संघाच्या अस्लम आणि पंकज मोहिते यांच्या उत्कृष्ट चढाया आणि शादलुई, अबिनेश व गौरव कट्टी यांची पकडीत मिळालेली साथ यामुळे पुणेरी पलटण संघाने आपला दबदबा कायम ठेवला.

pkl season 10 puneri paltan beat patna pirates to enter in finals of pro kabaddi
BCCI Central Contract: इशान किशन - श्रेयस अय्यर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर! आता पुन्हा टीम इंडियाकडून खेळू शकणार का?

सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना पटना संघाने बरोबरी साधण्याचे आटोकाट प्रयत्न केले. परंतु पुणेरी पलटण संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com