haryana steelers vs dabang delhi  saam tv news
Sports

PKL 2023: नवीनचं सुपर १० व्यर्थ! शेवटच्या मिनिटाला हरियाणा स्टीलर्सने दबंग दिल्लीच्या तोंडचा घास हिसकावला

Pro Kabaddi 2023: प्रो कबड्डी लीग २०२३ स्पर्धेतील १७ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

Haryana Steelers vs Dabang Delhi,PKL 2023:

प्रो कबड्डी लीग २०२३ स्पर्धेतील १७ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers vs Dabang Delhi) आणि दबंग दिल्ली हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने बाजी मारत दबंग दिल्ली संघावर ३५-३३ ने विजय मिळवला आहे. या हरियाणा स्टीलर्सचा या हंगामातील सलग दुसरा विजय ठरला आहे. तर गेल्या ३ सामन्यात दिल्लीचा हा दुसरा पराभव ठरला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, हरियाणा स्टीलर्सकडून सिद्धार्थ देसाईने सर्वाधिक १० गुणांची कमाई केली. तर बचाव करताना मोहित नंदल आणि मोहितने प्रत्येकी ३-३ गुणांची कमाई केली. दबंग दिल्ली संघाकडून कर्णधार नवीन कुमार चमकला. त्याने संघासाठी सर्वाधिक १६ गुणांची कमाई केली. तर पकड करताना हिम्मतने ३ गुणांची कमाई केली.

या सामन्यातील पहिल्या हाल्फमध्ये दबंग दिल्ली संघाने हरियाणा स्टीलर्स संघावर २१-१७ ने आघाडी घेतली होती. या सामन्यात हरियाणा स्टीलर्स संघाच्या डिफेन्सला हवी तशी कामगिरी करता आली नाही. सुरुवातीच्या १० मिनिटात या संघाने डिफेन्समध्ये एकही गुण घेतला नव्हता. ११ व्या मिनिटाला मितूला बाद करत हरियाणा स्टीलर्सच्या डिफेन्सने खातं उघडलं. (Latest sports updates)

दिल्लीवर ऑल आऊटचं संकट असताना नवीन कुमार संघाच्या मदतीला धावून आला. मात्र १९ व्या मिनिटाला सिद्धार्थ देसाईने दिल्लीच्या दोन्ही खेळाडूंना बाद करत दिल्लीवर पहिला लोन चढवला. त्यामुळे पहिल्या हाल्फच्या समाप्तीनंतर दोन्ही संघांमध्ये ४ गुणांचा फरक होता.

सामन्यातील शेवटच्या ९ मिनिटात दोन्ही संघांमध्ये केवळ ४ गुणांचा फरक होता. सिद्धार्थ देसाईने आपलं सुपर १० पूर्ण केलं. ३८ व्या मिनिटाला सिद्धार्थ देसाईला बाद केल्यानंतर नवीन कुमार आत आला. त्याने सलग ३ रेड्समध्ये हरियाणाच्या ३ डिफेंडरला बाद केलं. सामन्याचा शेवटच्या मिनिटाला हरियाणाचा संघ केवळ ३ गुणांनी आघाडीवर होता. आशीषने १ गुणाची कमाई करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT