Prithvi Shaw Century saam tv news
क्रीडा

Prithvi Shaw: संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ ने ठोकल्या १५९ धावा! टीम इंडियात कमबॅक करण्याचा केला दावा

Prithvi Shaw Century:काही महिने नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत आपल्या फिटनेसवर मेहनत घेतल्यानंतर त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत दमदार कमबॅक केलं आहे

Ankush Dhavre

Prithvi Shaw Century News:

गेल्या काही वर्षांपासून संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ ने संघात कमबॅक करण्यासाठी दावा केला आहे. काही महिने नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत आपल्या फिटनेसवर मेहनत घेतल्यानंतर त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत दमदार कमबॅक केलं आहे.

मुंबई विरुद्ध छत्तीसगड यांच्यातील सामन्यात १८५ चेंडूंचा सामना करत १५९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १८ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. या खेळीदरम्यान त्याने भूपेनसोबत मिळून २४४ धावा जोडल्या.

दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी..

येत्या काही दिवसांत आयपीएल २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार पृथ्वी शॉ फॉर्ममध्ये येणं ही दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बाब आहे. गेल्या हंगामात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

संघाचा कर्णधार रिषभ पंत खेळणार की नाही हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स संघासाठी गेम चेंजर ठरु शकतो. पृथ्वी शॉ आक्रमक शैलीने फलंदाजी करतो. त्याने जर संघाला चांगली सुरुवात करुन दिली, तर विरोधी संघातील गोलंदाजांना सामन्यात कमबॅक करणं कठीण होऊन जाईल. (Cricket news in marathi)

भारतीय संघात कमबॅक करणार?

पृथ्वी शॉ ने २०१९ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. त्याने वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं आहे.त्यावेळी त्याला भविष्यातील सचिन तेंडुलकर म्हटलं जात होतं. मात्र त्यानंतर त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं. तो २०२१ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्याला भारतीय संघासाठी ५ कसोटी, ६ वनडे आणि १ टी-२० सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT