Rishabh Pant IPL 2024: 'रिषभ पंत आयपीएल खेळणार,पण...', रिकी पाँटींगने गुड न्यूज देत केला मोठा खुलासा

Ricky Ponting On Rishabh Pant: गेल्या वर्षी कार अपघातात गंभीर जखमी झालेला रिषभ पंत आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
rishabh pant ricky ponting
rishabh pant ricky ponting yandex
Published On

Ricky Ponting On Rishabh Pant Comeback:

आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेला येत्या काही दिवसांत सुरुवात होणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रिकी पाँटींगने रिषभ पंतच्या खेळण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. गेल्या वर्षी कार अपघातात गंभीर जखमी झालेला रिषभ पंत आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

क्रिकबजचा हवाला देत रिकी पाँटींग रिषभ पंतबाबत बोलताना म्हणाला की,'रिषभला विश्वास आहे की, तो आयपीएल खेळण्यासाठी तयार आहे. मात्र तो फुल स्ट्रेन्थमध्ये खेळणार की नाही याबाबत अजूनही शास्वती नाही. तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल की, तो धावतोय तो सराव करतोय. मात्र आमच्या पहिल्या सामन्याला अवघे ६ आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तो विकेटकिपिंग करेल की नाही याबाबत अजुनही खात्री नाही.'

rishabh pant ricky ponting
IND vs ENG Test Series: सामना जिंकूनही टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; या कारणांमुळे मालिका जिंकणं कठीण

तसेच तो पुढे म्हणाला की,'मात्र मी खात्रीशीर सांगु शकतो की,मी जर त्याला विचारलं की तू खेळण्यासाठी तयार आहेस का? तर तो म्हणेल की मी सर्व सामने खेळत आहे. मी सर्व सामन्यांमध्ये कीपिंग करत आहे आणि मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. मात्र आम्ही फिंगर्स क्रॉस्ड करु.' (Cricket news in marathi)

'तो आमचा कर्णधार आहे. आम्ही गेल्या वर्षी त्याला खूप मिस केलं. गेल्या १२-१३ महिन्यांचा प्रवास पाहिला तर तो अपघात खूप भयानक होता. तो स्वत:ला भाग्यवान मानत असेल की तो वाचला आणि पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.' असं रिकी पाँटिंग म्हणाला.

rishabh pant ricky ponting
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड मालिका रद्द होणार? इंग्लंडचा संघ परदेशात जाणार! वाचा कारण

'आम्ही फिंगर्स क्रॉस करु, आम्ही आशा करतो की तो लवकरात लवकर कमबॅक करेल. तो सर्व सामने नाही खेळला तरी चालेल १४ पैकी १० सामने खेळला तरी आमच्यासाठी बोनस असेल.'रिषभ पंत कमबॅक करणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र अजूनही अधिकृत माहीती समोर आलेली नाही. जर रिषभ पंत कमबॅक करु शकला नाही तर डेव्हिड वॉर्नर संघाचं नेतृत्व करताना दिसेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com