prithvi shaw
prithvi shawsaam tv

Prithvi Shaw Injury: पृथ्वी शॉला कोणाची नजर लागली? बॅक टू बॅक शतकांनंतर आता थेट संघाबाहेर; काय आहे कारण?

Prithvi Shaw Ruled Out: दमदार फॉर्ममध्ये असलेला पृथ्वी शॉ रॉयल लंडन कप स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
Published on

Royal London Cup Prithvi Shaw Ruled Out:

इंग्लंडमध्ये सध्या रॉयल वनडे कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ देखील खेळताना दिसून येतोय. भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी तो या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडताना दिसून येत आहे.

या स्पर्धेत एका पाठोपाठ एक शतके झळकावणाऱ्या पृथ्वी शॉला कोणाची तरी नजर लागली आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असूनही दुखापतीमुळे त्याला आता बाहेर बसावं लागणार आहे.

prithvi shaw
Ben Stokes Comeback: आधी वनडेतून संन्यास, माघार अन् आता संघात थेट मोठी जबाबदारी; NZ विरुद्धच्या मालिकेसाठी बेन स्टोक्सला संधी

आउट ऑफ फॉर्म मध्ये असलेल्या पृथ्वी शॉने स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये १९ षटकार आणि ४९ चौकारांसह धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र आता तो आता दुखापतग्रस्त झाला आहे. नॉर्थम्पटनशायर संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ' डरहॅम संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना पृथ्वी शॉच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आज स्कॅन रिपोर्ट आल्यानंतर ही दुखापत गंभीर असल्याचं दिसून आलं आहे.'

पृथ्वी शॉ या स्पर्धेत दमदार फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने या स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये ४२९ धावा ठोकल्या आहेत. त्याने समरसेट संघाविरुध्द खेळताना विक्रमी २४४ धावांची खेळी केली होती. डरहॅमविरुध्द झालेल्या सामन्यात १२५ धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉ आतापर्यंत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

पृथ्वी शॉच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याला हवं तितकं यश मिळालं नाही. पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावूनही त्याला संघात स्थान कायम ठेवता आलं नाही. त्याने ५ कसोटी सामन्यांमध्ये ४२.३८ च्या सरासरीने ३३९ धावा केल्या आहेत. तर ६ वनडे सामन्यांमध्ये १८९ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

prithvi shaw
IND vs IRE: कर्णधार, उपकर्णधारासह संपूर्ण संघ बदलणार! आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

पृथ्वी शॉला भारतीय संघात कमबॅक करण्याचा एकमेव मार्ग शिल्लक होता तो म्हणजे, आगामी एशियन गेम्स स्पर्धा.

मात्र या स्पर्धेसाठी देखील त्याला भारतीय संघात संधी दिली गेली नाही. तसेच आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकपसाठी निवडल्या जाणाऱ्या संघातही त्याला स्थान मिळणं कठीण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com