इंग्लंडच्या वनडे वर्ल्डकप जिंकून देणारा आक्रमक खेळाडू बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला होता. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने वनडे क्रिकेटला राम राम ठोकला होता.
मात्र भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी त्याने निवृ्त्तीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डने बुधवारी (१६ ऑगस्ट) न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ४ वनडे आणि ४ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका ३० ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.
बेन स्टोक्सची निवृत्तीतून माघार..
बेन स्टोक्सने जुलै २०२२ मध्ये वनडे क्रिकेटमधून निवृ्त्त होणार असल्याची घोषणा केली होती. आगामी वनडे वर्ल्डकप पाहता त्याने वनडे संघात कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. वनडे वर्ल्डकप २०१९ स्पर्धेत इंग्लंडने जेतेपदाला गवसणी घातली होती.
इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत इंग्लंड संघाला जेतेपद मिळवून देण्यात बेन स्टोक्सने मोलाची भुमिका बजावली होती. स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याने महत्वपूर्ण खेळी केली होती. आता इंग्लंडला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवण्यासाठी त्याने निवृत्तीतून माघार घेतली आहे. (Latest sports updates)
न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार), बेन स्टोक्स, मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल रसीद, जो रूट, जेसन रॉय, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स
न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ:
जोस बटलर, रेहान अहमद, मोईन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जोश टंग, जॉन टर्नर, ल्यूक वुड
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.