Playoff scenario for royal challengers bangalore in womens premier league cricket news in marathi  twitter
क्रीडा

WPL Playoffs Scenario: RCB अजूनही करु शकते प्लेऑफमध्ये प्रवेश; जाणून घ्या कसं असेल समीकरण

RCB Playoff Scenario: वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धा आता रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त होणार असून लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

RCB Playoff Scenario:

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धा आता रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त होणार असून लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला १ धावेने पराभूत करत दिल्ली कॅपिटल्स संघाने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता १ स्थानासाठी ३ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दरम्यान या संघांसाठी कसं असेल प्लेऑफमध्ये पोहचण्याचं समीकरण? समजून घ्या.

साखळी फेरीत आता केवळ ३ सामने शिल्लक राहिले आहेत. गुजरात जायंट्सला अजूनही २ सामने खेळायचे आहेत. या संघाचा पुढील सामना ११ मार्च रोजी यूपी वॉरियर्स संघासोबत तर १३ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. तर १२ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सामना मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणार आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स संघासाठी येणारे पुढील सामने करो यो मरो असणार आहेत. गुजरातने २ पैकी एकही सामना गमावला तर गुजरातचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडेल. (Cricket news in marathi)

या स्पर्धेतील गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचे प्रत्येकी १०-१० गुण आहेत. मात्र नेट रनरेट चांगला असल्याने दिल्ली कॅपिटल्सचा संघ अव्वल स्थानी आहे. तर मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. RCB चा संघ या यादीत तिसऱ्या स्थानी आणि यूपी वॉरियर्सचा संघ चौथ्या स्थानी आहे.

RCB ला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ अजूनही अधिकृतरित्या या स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही. या संघाचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. तसेच त्यांना प्रार्थना देखील करावी लागेल की, यूपी वॉरियर्सचा संघ गुजरातकडून पराभूत झाला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

SCROLL FOR NEXT