Mumbai Indians Captaincy: हार्दिकला कर्णधारपद देण्याचा निर्णय चूक की बरोबर? सुनील गावसकरांनी एका शब्दात दिलं उत्तर

Hardik Pandya Rohit Sharma Mumbai Indians Captaincy: मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवणं हा निर्णय योग्य आहे की अयोग्य याबाबत सुनील गावसकरांनी भाष्य केलं आहे.
sunil gavaskar on mumbai indians captaincy
sunil gavaskar on mumbai indians captaincysaam tv news
Published On

Sunil Gavaskar On Mumbai Indians Captaincy:

मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) सोपवणं हा योग्य निर्णय आहे, असं स्पष्ट सुनील गावसकरांनी व्यक्त केलं आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलाव सोहळ्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी त्याच्याकडे सोपवली. या निर्णयाचा क्रिकेट फॅन्सकडून जोरदार विरोध करण्यात आला. मुंबई इंडियन्सच्या फॉलोवर्सची संख्या देखील कमी झाली.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar)म्हणाले की, ‘ त्यांनी नेहमीच फ्रँचायझीच्या भविष्याचा विचार केला आहे. रोहित शर्मा ३६ वर्षांचा आहे. त्याच्यावर भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटच्या नेतृत्वाचा दबाव आहे. त्यांनी हा दबाव कमी करण्यासाठी ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे. हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सला सलग २ वेळेस गुजरात टायटन्सला फायनलमध्ये पोहचवलं आहे. एक वेळेस फायनल जिंकूनही दिली आहे.’ (Cricket news in marathi)

sunil gavaskar on mumbai indians captaincy
IND vs ENG Test Series: 'रहाणे,पुजाराकडून काहीतरी शिका..' माजी क्रिकेटपटू इशान- अय्यरवर भडकला

रोहित शर्मावर नेतृत्वाचा दबाव आहे. आता नेतृत्वाची जबाबदारी काढून घेतल्यानंतर त्याच्यावर असलेला दबाव कमी होईल. फ्रँचायजीला याचा फायदाच होणार आहे. असं सुनील गावसकरांचं म्हणणं आहे. रोहित शर्माने गेल्या हंगामातील १६ सामन्यांमध्ये ३३२ धावा केल्या आहेत. भारतीय संघाचं नेतृत्व करत असतानाही त्याने मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहचवलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ८७ सामने जिंकले आहेत. तर ७६ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

sunil gavaskar on mumbai indians captaincy
Jasprit Bumrah News: तिसऱ्या कसोटीतून जसप्रीत बुमराह बाहेर? वाचा कारण

मुंबई इंडियन्सला फायदा होणार..

सुनील गावसकर पुढे म्हणाले की, ‘हार्दिक पंड्याकडे संघाची जबाबदारी सोपवणं हे मुंबई इंडियन्स फायदेशीर ठरणार आहे. आता रोहित शर्मा टॉप ऑर्डरममध्ये बिनधास्त होऊन फलंदाजी करु शकतो. तर हार्दिक पंड्या तिसऱ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना २०० पेक्षा अधिक धावा करु शकतो.’

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com