टी-२० आणि वनडे मालिका झाल्यानंतर आता भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ कसोटी (India vs South Africa) सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. वर्ल्डकप फायनलनंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच खेळताना दिसून येणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी रोहितला मोलाचा सल्ला दिला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला कसोटी सामना सेंचुरियनच्या मैदानावर रंगणार आहे. रोहित शर्मा या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. हा पराभव विसरुन भारतीय संघ पुढे जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत रोहित शर्माने दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले होते. डावाची सुरुवात करताना त्याने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली होती. या स्पर्धेतील त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १२५ च्या स्ट्राईक रेटने ५९७ धावा केल्या. त्याने या स्पर्धेत पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली. मात्र सुनील गावसकरांचं असं म्हणणं आहे की, रोहितने आपल्या फलंदाजी शैलीत बदल करावं. (Latest sports updates)
सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर चर्चा करताना म्हटले की,'त्यावेळी तो वनडे फॉरमॅटमध्ये फलंदाजी करत होता. त्याने त्यावेळी आक्रमक फलंदाजी करत सुरुवातीच्या १० षटकात जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. वर्ल्डकपसाठी त्याचा हाच दृष्टीकोण होता. मात्र कसोटी क्रिकेटसाठी त्याला आपला दृष्टीकोण बदलावा लागणार आहे. जर त्याने पूर्ण दिवस फलंदाजी केली तर त्याच्याकडे क्षमता आहे की, तो १५० पेक्षा अधिक धावा करु शकतो. असं झाल्यास भारतीय संघ ३००-३५० धावांच्या पुढे जाऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.