players who may announce retirement after ipl 2024 ms dhoni faf du plessis amd2000 twitter
क्रीडा

IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेसह या दिग्गज खेळाडूंची कारकिर्द संपली?

Players Retirement After IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर काही खेळाडू आयपीएल स्पर्धेला रामरार करु शकतात.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. स्पर्धेतील प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ ठरले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद , राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना २१ मे पासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना २६ मे रोजी खेळवला जाईल. दरम्यान काही दिग्गज खेळाडू आहेत, जे हे हंगाम संपल्यानंतर आयपीएल स्पर्धेला रामराम करू शकतात.

एमएस धोनी -

एमएस धोनी हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. हे धोनीचं शेवटचं हंगाम असल्याची चर्चा सुरू होती. आता चेन्नईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर धोनी निवृत्ती जाहीर करू शकतो.

फाफ डू प्लेसिस -

फाफ डू प्लेसिस सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. ३९ वर्षांच्या फाफ डू प्लेसिसचं हे शेवटचं आयपीएल हंगाम असू शकतं.

पीयूष चावला-

आयपीएल २००८ पासून मुंबई इंडियन्स संघासाठी खेळणारा पीयूष चावला या हंगामातही मुंबईकडून खेळताना दिसून आला. त्याने आतापर्यंत १८४ सामन्यांमध्ये १८१ गडी बाद केले आहेत.

शिखर धवन-

पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार शिखर धवन हा आयपीएल स्पर्धेतील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत तो पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व करतोय. या हंगामातील सुरुवातीचे काही सामने झाल्यानंतर त्याला दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं. असा अंदाज वर्तवला जात आहे की, हे त्याचं शेवटचं आयपीएल हंगाम असू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT