राजस्थानच्या राजकारणात मोठा ऐतिहासिक बदल होण्याची शक्यता आहे. मागच्या 49 वर्षांपासून स्थिर असलेल्या विधानसभेच्या संख्यामध्ये आता वाढ होऊ शकते. विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी जनगणनानंतर राज्यातील आमदारांची संख्या 200 वरून 270 होऊ शकते. जयपूर येथील एका कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, विधानसभेत 280 आमदार बसण्याची आसन व्यवस्था असणारा मोठा हॉल बांधण्याचा आम्ही विचार करत आहे. सध्या फक्त 200 आमदार बसू शकता इतकी आसन व्यवस्था आहे.
लवकरच देशात जनगणना होणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल. राजस्थानमध्ये तब्बल 70 आमदारांची संख्या वाढू शकते. तसेच आम्ही भविष्याच्या दृष्टीने हा विचार करत आहोत त्या अनुषंगाने सभागृह वाढवले जात आहे असे ते विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
1952 पहिली निवडणूक- 160 जागा
1957 दुसरी निवडणूक - 176 - 16 जागांची वाढ
1967 चौथी निवडणूक - 184 - आणखी 8 जागा वाढवण्यात आल्या
1977 सहावी निवडणूक- 200
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी विधानसभा संकुल आधुनिक आणि अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी १४ कोटी रुपये इतक्या निधीची घोषणा केली आहे.
राजकीय नकाशा कसा बदलेल?
जागांच्या संख्येत वाढ झाल्याने राजस्थानच्या राजकारणावर आणि भूगोलावर थेट परिणाम होईल. ७० नवीन जागांच्या निर्मितीमुळे राज्यातील अनेक तरुण आणि नवीन नेत्यांना विधानसभेत पोहोचणे सोपे होईल. सीमांकन दरम्यान, लोकसंख्येच्या आधारावर अनेक सामान्य जागा अनुसूचित जाती/जमातींसाठी राखीव ठेवल्या जाऊ शकतात, तर काही सध्या राखीव जागा सामान्य होऊ शकतात. अनेक मोठे विधानसभा मतदारसंघ दोन भागात विभागले जातील, ज्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रणात बदल होतील. तसेच राजकीय नकाशा देखील बदलला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.