आयपीएल २०२४ स्पर्धेतील ७० वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार होता. मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना टॉस न होताच रद्द करण्यात आला. पावसामुळे राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण सामना सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या स्थानी असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ सामना रद्द झाल्यानंतर तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाला नंबर १ ला जाण्याची संधी होती. मात्र सातत्याने सामने गमावल्यामुळे या संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. दरम्यान शेवटचा सामना पावसामुळे धुतला गेल्याने आता राजस्थानचा संघ क्वालिफायरऐवजी एलिमिनेटरचा सामना खेळताना दिसून येणार आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता. त्यामुळे या संघाला दोनदा फायनलमध्ये जाण्याचा चान्स मिळाला असता.
चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्लेऑफ गाठलं. मात्र अंतिम ४ संघ रविवारी झालेल्या सामन्यानंतर ठरले. पंजाब किंग्जला पराभूत करून सनरायझर्स हैदराबाद संघाने १७ गुणांसह दुसरं स्थान गाठलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करून राजस्थान रॉयल्सकडे पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानी येण्याची संधी होती. मात्र पावसाने राजस्थान रॉयल्सच्या स्वप्नांवर पाणी ओतलं आहे.
आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर १ चा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर एलिमिनेटर १' च्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ भिडणार आहेत.
प्लेऑफच्या सामन्यांचं वेळापत्रक
२१ मे - क्वालिफायर १
२२ मे - एलिमिनेटर १
२४ मे - क्वालिफायर २
२६ मे - फायनल
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.