RCB VS DC IPL 2025 Highlights : चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी फिल सॉल्ट आणि विराट कोहली हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सलामीवीर मैदानात उतरले.
सलामीसाठी आलेला फिल सॉल्ट चांगल्याच फॉर्ममध्ये दिसला. दुसऱ्या ओव्हरमध्ये अक्षर पटेल गोलंदाजीसाठी आला. त्याच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर सॉल्टने सिक्स मारला. लगेच त्याने पाचव्या बॉलवर शानदार फोर मारला. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या मिचेल स्टार्कची सॉल्टने अक्षरक्ष: धुलाई केली. तिसऱ्या ओव्हरमध्ये 6, 4, 4, 5NB, 6, 1LB, 6LB अशा प्रकारे फिल सॉल्टने 30 धावा केल्या.
चौथ्या ओव्हरमध्ये अक्षर पटेल गोलंदाजी करत असताना एका चुकीमुळे फिल सॉल्ट रनआउट झाला. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर फिलने शॉट मारला. तो बॉल विपराज निगमकडे गेला. विपराजने बॉल केएल राहुलकडे थ्रो केला. याच दरम्यान सॉल्टने क्रीज सोडली होती. बॉल राहुलकडे जातोय हे पाहताच विराट कोहली मागे फिरला. पण सॉल्ट स्ट्राईकर एन्डला पोहोचायच्या आत राहुलने बॉलने स्टंप उडवून सॉल्टला माघारी पाठवले. विराटने मागे फिरण्याचा कॉल उशिरा दिल्याने सॉल्ट रनआउट झाला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग 11 -
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11 -
फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.