sunil chhetri twitter
क्रीडा

UEFA EURO 2024: युएफा युरो २०२४ स्पर्धेत सुनील छेत्री दिसणार नव्या भूमिकेत

Sunil Chhetri, UEFA EUR0 2024: युएफा युरो २०२४ स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार सुनील छेत्री नव्या भूमिकेत दिसणार आहे.

Ankush Dhavre

आघाडीचे क्रीडा प्रसारक, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क, प्रतिष्ठित UEFA EUROs सोबतच्या आपल्या सातत्यपूर्ण संलग्नतेची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. त्यामुळे भारतभरातील फुटबॉल प्रेमींना 2024 आवृत्तीचं थरारक प्रसारण LIVE पाहता येणार आहे. ही स्पर्धा रविवार, 14 जून 2024 ते रविवार, 14 जुलै 2024 या कालावधीत होणार आहे. वर्षातील सर्वात मोठ्या फुटबॉल महोत्सवाचे आयोजन जर्मनी करणार आहे.या स्पर्धेचा रोमांच वाढवण्यासाठी आणि फुटबॉल चाहत्यांना UEFA EURO 2024 च्या आणखी जवळ आणण्यासाठी, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने त्यांच्या लाईव्ह स्टुडिओ शो फुटबॉल एक्स्ट्रासाठी एक एक्सपर्ट पॅनेलची घोषणा केली आहे.

ज्यामध्ये फ्रान्सचा माजी कर्णधार पॅट्रिस एव्ह्रा, भारताचे माजी कर्णधार सुनील छेत्री आणि बायचुंग भुतिया, वर्तमान भारतीय संघाचा कर्णधार आणि गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू, भारताचे माजी फॉरवर्ड रॉबिन सिंग आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू तारे डेव्हिड जेम्स, डॉन हचिसन, टेरी फेलन, अ‍ॅशली वेस्टवुड आणि मार्क सिव्हरव्ह्ज यांचा समावेश आहे. अॅड्रियानो डेल मॉन्टे आणि ओलिव्हिया बुझागलो यांनी होस्ट केलेले फुटबॉल एक्स्ट्रावर एमिनेंट पॅनेलद्वारे दिले जाणारे सखोल विश्लेषण UEFA EURO 2024 चे अनुसरण करण्याचा अनुभव आणखी समृद्ध करेल, ज्यामध्ये मानस सिंग आणि अर्पित शर्मा हे जर्मनीहून लाईव्ह रिपोर्टिंग करतील.

सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या स्पर्धेतील सर्व LIVE अॅक्शन इंग्रजी, तेलगू, तमिळ , हिंदी, मल्याळम,आणि बंगाली भाषेत तुमच्या समोर घेऊन येणार आहे. 'होम ऑफ फुटबॉल इन इंडिया' इंग्रजीमध्ये Sony Sports Ten 2 SD & HD, हिंदीमध्ये Sony Sports Ten 3 SD & HD, तमिळ आणि तेलगूमध्ये Sony Sports Ten 4 SD & HD आणि बंगाली आणि मल्याळममध्ये Sony Sports Ten 5 SD & HD वर UEFA EURO 2024 चे बहुप्रतिक्षित LIVE प्रसारण करेल.

UEFA EURO 2024 फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठा आकर्षण ठरणार आहे. कारण फिफाच्या रँकिंगमध्ये असलेल्या टॉप १० पैकी ८ संघ या हाय प्रोफाईल स्पर्धेत आपला जलवा दाखवताना दिसून येणार आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल), हॅरी केन (इंग्लंड), ख्रिश्चियन एरिक्सन (डेन्मार्क), किलियन एम्बाप्पे (फ्रान्स) आणि टोनी क्रूस (जर्मनी) यांसारखे सर्वात लोकप्रिय खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. त्यामुळे फुटबॉल चाहत्यांना 30 दिवसांच्या स्पर्धेदरम्यान एक्शन-पॅक्ड सामने अनुभवायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : श्रीनिवास पवार बारामती मतमोजणी केंद्रावर दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT