pv sindhu lakshy sen saam tv
क्रीडा

Paris Olympics 2024: भारतीय शटलर जोमात! पीव्ही सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेनचा बाद फेरीत प्रवेश

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत शानदार खेळ करुन दाखवला आहे. स्पर्धेतील पाचव्या दिवशी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू अॅक्शनमध्ये होती. तिने महिला एकेरीमध्ये क्रिस्टन कुब्बाचा धूळ चारली. या शानदार विजयासह पीव्ही सिंधूने राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधूनंतर बॅडमिंटनमधून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लक्ष्य सेनन देखील जोनाथन क्रिस्टीचा सरळ सेटमध्ये पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

लक्ष्य सेनने आतापर्यंत ग्रुप स्टेजमध्ये शानदार खेळ करुन दाखवला आहे. त्याने ग्रुप स्टेजमधील शेवटच्या सामन्यात जोनाधन क्रिस्टीला धूळ चारली. या सामन्यातील विजयासह लक्ष्य सेनने बाद फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये जोनाथन क्रिस्टीने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. लक्ष्य सेनने २-८ ने मागे होता. त्यानंतर त्याने दमदार कमबॅक केलं आणि हा सेट २१-१८ ने आपल्या नावावर केला.

पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या लक्ष्य सेनने दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीपासूनच जोनाथन क्रिस्टीवर दबदबा बनवून ठेवला. दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्य सेनने जोनाथन क्रिस्टीचा २१-१२ ने पराभव केला आणि २-० ने हा सामना जिंकला.

पीव्ही सिंधूचा शानदार विजय

पीव्ही सिंधूने ग्रुप स्टेजमधील शेवटच्या सामन्यात क्रिस्टन कुब्बाचा २१-५ आणि २१-१० ने पराभव केला. पीव्ही सिंधूने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतला. तिने एकापाठोपाठ एक स्मॅश मारले आणि क्रिस्टन कुब्बावर दबाव बनवून ठेवला. या विजयासह तिने राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT