PV Sindhu : भारताचा झेंडा पॅरिसमध्ये फडकणार! पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यास सज्ज

PV Sindhu in Badminton Paris Olympics 2024: या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिंधू सुवर्ण पदक जिंकून भारतीय झेंडा पॅरिसमध्ये झळकवणार असल्याचा विश्वास संपूर्ण भारतीयांना आहे.
Badminton Paris Olympics
PV Sindhu Saam TV
Published On

भारतीय बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपला सर्वोत्कृष्ट खेळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. पीव्ही सिंधू भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.

तसंच या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिंधू सुवर्ण पदक जिंकून भारतीय झेंडा पॅरिसमध्ये झळकवणार असल्याचा विश्वास संपूर्ण भारतीयांना आहे. तसं झाल्यास सिंधू बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू असणार आहे. सिंधूने ऑलिम्पिक आणि BWF सर्किट सारख्या विविध स्पर्धांमध्ये पदकांची कामाई केलीय. तीने जवळपास प्रत्येक मोठ्या स्पर्धेत भारतासाठी पदकांची कमाई केलीय.

Badminton Paris Olympics
Paris Olympics 2024 Schedule: पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू सज्ज! केव्हा, कुठे अन् किती वाजता रंगणार सामने?वाचा सविस्तर

2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य पदक जिंकले होते. तर 2020 च्या टोकिओ ऑलिम्पिकमध्ये तीने कांस्यपदकाची कमाई केली होती. 2022 मध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तीने सुवर्ण पदक जिंकले होते. तसंच तीने आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील पदकांची कमाई केली आहे. तीने 2018 मध्ये जकार्ता येथे पार पडलेल्या स्पर्धेत रौप्य पदक तर 2014 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

सिंधूने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 5 पदकांची कमाई केली आहे. 2013 आणि 2014मध्ये जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदक जिंकले, तर 2017 आणि 2018 मध्ये तीने रौप्य पदक जिंकले होते. याशिव सिंधूने 2019 साली झालेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकत विजेतेपद देखील पटकावले होते.

2023 मध्ये सिंधूला फॉर्मसाठी संघर्ष करावा लागला होता. मात्र तीने दुबईतील बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक जिंकून दिले होते. ते भारताचे पहिले पदक होते. तसंच 2018मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन समारंभात पी. व्ही. सिंधू भारताची ध्वजवाहक होती.

सिंधूच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला भारत सरकारकडून सन्मानित देखील करण्यात आलं आहे.

सिंधूला मिळालेले पुरस्कार

2013- अर्जुन पुरस्कार

2015- पद्मश्री

2016- राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

2020- पद्मभूषण पुरस्कार

Badminton Paris Olympics
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत किती खेळ खेळले जातील? या 5 नव्या खेळांचा समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com