paris olympics  twitter
Sports

Paris Olympics 2024: मनू भाकर आणखी एक पदक जिंकून देणार? जाणून घ्या चौथ्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक

Paris Olympics 2024, Day 4 Schedule: भारतीय खेळाडूंना ३ दिवसात केवळ १ पदकावर नाव कोरता आलं आहे. दरम्यान चौथ्या दिवशी ही संख्या वाढू शकते.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताला आतापर्यंत केवळ १ पदक जिंकता आलं आहे. स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी भारताला १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरने कांस्यपदक जिंकून दिलं. हे भारताचं या स्पर्धेतील पहिलं आणि एकमेव पदक ठरलं आहे. स्पर्धेतील तिसऱ्या भारताची ३ पदकं हुकली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

तिसऱ्या दिवशी ३ पदकं हुकली

या स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी पदकांच्या तालिकेत ३ पदकांची भर टाकता येऊ शकली असती. मात्र महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रमीता जिंदाल ७ व्या क्रमांकावर राहिली. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अर्जुन बबुताकडेही पदकावर नाव कोरण्याची संधी होती. मात्र त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.

शेवटी तिरंदाजीत भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान स्पर्धेतील चौथ्या दिवशी भारतीय खेळाडू किती वाजता अॅक्शनमध्ये असतील? जाणून घ्या.

असं आहे वेळापत्रक (दिवस चौथा- ३० जुलै)

12:30 PM

  • शूटिंग - पुरुष ट्रॅप (क्वालिफिकेशन - दिवस 2): पृथ्वीराज टोंडाईमान

  • शूटिंग - महिला ट्रॅप (क्वालिफिकेशन - दिवस 1): राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग

1:00 PM

  • शूटिंग - मिक्स 10 मीटर एअर पिस्टल टीम (कांस्यपदक सामना): सरबजोत सिंग आणि मनू भाकर

1:40 PM

  • रोइंग - पुरुष सिंगल्स स्कल्स (क्वार्टर फायनल): बलराज पनवार

1:44 PM

  • आर्चरी - महिला सिंगल्स (राउंड ऑफ 64): अंकिता भाकत

1:57 PM

  • आर्चरी - महिला सिंगल्स (राउंड ऑफ 64): भजन कौर

2:23 PM

  • आर्चरी - महिला सिंगल्स (राउंड ऑफ 32): *पात्रतेनुसार

2:30 PM

  • घोडेस्वारी - ड्रेसाज सिंगल्स ग्रँड प्रिक्स (दिवस 1): अनुश अग्रवाल्ला

4:45 PM

  • हॉकी - पुरुष टीम (गट स्तर): भारत विरुद्ध आयर्लंड

  • 5:30 PM

  • बॅडमिंटन - पुरुष दुहेरी (गट स्तर): सत्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी

6:20 PM

  • बॅडमिंटन - महिला दुहेरी (गट स्तर): अश्विनी पोनप्पा आणि तनीषा क्रास्टो

7:00 PM

  • शूटिंग - पुरुष ट्रॅप (फायनल): *पात्रतेनुसार

7:15 PM

  • आर्चरी - पुरुष सिंगल्स (राउंड ऑफ 64): धीरज बोम्मदेवरा

7:16 PM

  • बॉक्सिंग - पुरुष 51 किलो (राउंड ऑफ 16): अमित पंघाल

7:55 PM

  • आर्चरी - पुरुष सिंगल्स (राउंड ऑफ 32): *पात्रतेनुसार

9:24 PM

  • बॉक्सिंग - महिला 57 किलो (राउंड ऑफ 32): जैस्मिन लांबोरिया

1:22 AM (जुलै 31)

  • बॉक्सिंग - महिला 54 किलो (राउंड ऑफ 16): प्रीती पवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT