पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी मोठी बातमी बातमी आहे. भाताच्या नेमबाजांनी पहिलं मेडलं मिळवून दिलं आहे. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारत कांस्यपदक पटकावत इतिहास रचला आहे. मनू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलंच पदक आहे.. मनूने अंतिम फेरीत एकूण 221.7 गुण मिळवले.
ऑलिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पाचवे पदक ठरलं आहे. कोरियन खेळाडू ओ ये जिनने सुवर्ण (२४३.२ गुण) आणि किम येजीने (२४१.३) रौप्यपदक पटकावलं आहे. मनू भाकर 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत एकूण 580 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. भाकरने पहिल्या राऊंडमध्ये 97, दुसऱ्या 97, तिसऱ्यामध्ये 98, चौथ्यामध्ये 96, पाचव्यामध्ये 96 आणि सहाव्या राऊंडमध्ये 96 गुण मिळवले. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत रिदम सांगवानही सहभागी होत होती. पण रिदमला ५७३ गुणांसह १५व्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
मनू भाकरसाठी टोकियोमधील नेमबाजी स्पर्धेची अंतिम फेरी खूपच धक्कादायक ठरली होती. मेडल मिळण्याची खात्री असतानाच तिच्या पिस्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ती अंतिमफेरीत पोहोचू शकली नव्हती. या प्रकारानंतर तिला अश्रू रोखता आले नव्हते. मात्र अपेक्षेप्रमाणे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिने चांगली कामगिरी करत शनिवाही पहिल्याच दिवशी तिने अंतिम फेरी गाठली होती. संपूर्ण देशाकडून तिच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. अखेर तिने हा विश्वास सार्थ ठरवत कांस्य पदकावर मोहोर उमटवली.
मनू भाकर 10 मीटर एअर पिस्टप प्रकारातील भारताची प्रसिद्ध नेमबाज आहे. 18 फेब्रुवारी 2002 रोजी हरियाणातील झज्जरमध्ये तिचा जन्म झाला आहे. लहानपणापासूनच तिला नेमबाजीत रस होता. 2018 युवा ऑलिंपिक गेम्समध्ये तीने झालेल्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. तर ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकांसह अनेक पदके मिळवली आहेत. आशियाई खेळांमध्येही पदक जिंकली असून नेमबाजीत भारतासाठी मोठं योगदान राहिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.