pakistan twitter
Sports

Terror Attack On Champions Trophy: ज्याची भीती होती तेच झालं...चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ल्याचं संकट

Pakistan Terror ISKP Alert Kidnap champions trophy 2025 stadium: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दरम्यान पाकिस्तानवर दहशतवादी हल्ल्याचं संकट ओढावलं आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले गेले आहे. तब्बल २९ वर्षांनंतर पाकिस्तानात कुठल्याही आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. पाकिस्तानात स्पर्धेचे आयोजन न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, दहशतवादी हल्ल्याची भीती. त्यामुळेच भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला होता. आता चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्यासाठी पाकिस्तानात येणाऱ्या फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जात आहेत. तर उर्वरीत सर्व संघांचे सामने पाकिस्तानात आयोजित केले जात आहेत. या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी पाहूण्यांचे अपहरण करण्याचा प्लान केला जात आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे.

इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) अरब आणि चिनी नागरिकांचे खंडणीसाठी योजना आखत आहेत. या देशांमधून येणाऱ्या नागरिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानतळ, बंदरे आणि निवासी क्षेत्रांवर ते नजर ठेवून आहेत.

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतचे कार्यकर्ते घर भाड्याने घेण्याची योजना आखत आहेत. शहरांच्या बाहेरील भागात जिथे सीसीटीव्ही नाहीत किवा फक्त मोटरसायकल आणि रिक्षाने पोहोचता येईल अशीच ठिकाणं निवडली असती. हे अपहरणकर्ते, रात्रीच्या वेळी अपहरण करुन त्या व्यक्तींना या घरांमध्ये ठेवण्याचा प्लान करत आहेत.

आता अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेने अधिकाऱ्यांना महत्वाच्या ठिकाणांवर इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतच्या संभाव हल्ल्याबद्दल सतर्क केलं आहे. याबाबत माहिती मिळताच, संबधितांचा शोध घेण्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरु केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : सर्व विसरून ठाकरे बंधू एकत्र ही मोठी गोष्ट, तेजस्विनी पंडीतचं विधान

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैकिांनी फोडलं, पाहा VIDEO

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

SCROLL FOR NEXT