Mohammad Hafeez  Google
Sports

PAK vs AUS: बायकोसोबत कॉफी पिणं पडलं महागात; पाक क्रिकेट संघ संचालकाच विमान चुकलं

Mohammad Hafeez : प्रवास करताना ऐनवेळी चहा कॉफी पिण्याचं मन झालं. त्यावेळी आपली काय फजिती होते, याची प्रचिती पाकिस्तानच्या संघ संचालकाला झालीय. पत्नीसोबत कॉफी पिण्यात गुंग झालेल्या संघ संचालक मोहम्मद हाफीजनं सिडनीला जाणारं थेट विमानचं चुकवलं.

Bharat Jadhav

Mohammad Hafeez Miss His Flight For Coffee :

पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक हफीज पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान- ऑस्ट्रेलियाच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. पराभव का झाला याचे कारण विचित्र कारण सांगून तो चर्चेत आला होता. (Latest News)

मोहम्मद हाफिज सध्या कॉफीमुळे चर्चेत आलाय. हाफिजला बायकोसोबत कॉफी पिणं महागात पडलंय. त्याचं झालं असं, पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील अखेरचा सामना सिडनी येथे होणार आहे. यासाठी पाकिस्ताचा संघ (Pakistan team) मेलबर्नहून सिडनीला रवाना झाला. संघ निघत असताना संघाचा संचालक मोहम्मद हफीज त्याच्या बायकोसोबत कॉफी पीत होता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कॉफी (coffee) पिण्यात मग्न झाल्यामुळे हाफीजचं सिडनीला जाणारं विमान चुकलं. याविषयीचे वृत्त पाकिस्तानची वृत्तवाहिनी जिओ न्यूजने दिले आहे. पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीनुसार, हफीज आणि त्याची पत्नी विमानतळावर कॉपी पीत होते. त्यावेळी त्यांनी विमानाची वेळ तपासली नाही. कॉफी पिण्यात या दोघांनी आपलं सिडनीचं विमान चुकवलं. विमान चुकल्यानंतर या दोघांनी सिडनीसाठी दुसऱ्या विमानाने प्रवास केला. जर तुम्ही प्रवास करताना ऐनवेळी चहा-कॉफी पिण्याचा विचार करत असाल तर आधी तुमच्या वाहनाचं वेळापत्रक पहा. नाहीतर तुम्ही तुमची गाडी चुकवाल.

पाकिस्तानचा पुढील सामना

मालिकेतील अखेरचा सामना म्हणजे पाकिस्तानसाठी अस्तित्वाची लढाई आहे. ३ ते ७ जानेवारीदरम्यान तिसरी कसोटी खेळली जाणार आहे. खरं तर मागील २८ वर्षांत एकदाही पाकिस्तानाला ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर विजय मिळवता आलेला नाहीये. त्यामुळे हा लाजिरवाणा विक्रम मोडण्याचे आव्हान शान मसूदच्या नेतृत्वातील संघावर आहे. या मालिकेनंतर पाकिस्तान न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार असून यासाठी संघाची घोषणा झाली आहे. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात प्रथमच पाकिस्तान न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळेल.

न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानी संघ

शाहीन आफ्रिदी (कर्णधार), आमिर जमाल, अब्बास आफ्रिदी, आझम खान, अबरार अहमद, बाबर आझम, फखर झमान, हारिस रौफ, हसिबुल्लाह खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसिम, सहिबझादा फर्हान, सैय अयुब, उसामा मीर, झमान खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT