सध्या यूएई आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार सुरु आहे.या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात यूएईने अफगाणिस्तानवर ११ धावांनी विजय मिळवला आहे. ३ टी-२० सामन्यांची मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे.
या सामन्यात यूएईचा गोलंदाज अली नसरने दमदार गोलंदाजी केली. तर फलंदाजी करताना मुहम्मद वसीमने ५३ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार मारले. यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
मुहम्मद वसीमचा रेकॉर्ड..
मुहम्मद वसीम हा एका कॅलेंडर ईअरमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.यूएईसाठी ३ षटकार मारताच हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या ३ षटकारांसह त्याने २०२३ वर्षात षटकांची शंभरी गाठली आहे.
या वर्षात त्याने १०१ षटकार मारले आहेत.यासह तो एकाच वर्षात १०० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. हो रेकॉर्ड जगातील सर्वात विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा आणि ख्रिस गेललाही करता आला नव्हता.
रोहितने यावर्षी फलंदाजी करताना ८० षटकार मारले आहेत. तो या रेकॉर्डच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानीही रोहित शर्मा आहे. रोहितने २०१९ मध्ये ७८ षटकार मारले होते. (Latest sports updates)
हे आहेत एकाच वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज..
मुहम्मद वसीम - १०१ षटकार (२०२३)
रोहित शर्मा - ८० षटकार (२०२३)
रोहित शर्मा - ७८ षटकार (२०१९)
रोहित शर्मा - ७४ षटकार (२०१८)
सूर्यकुमार यादव - ७४ षटकार (२०१४)
रोहित शर्मा - ६५ षटकार (२०१४)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर,यूएईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यूएईकडून प्रथम फलंदाजी करताना मुहम्मद वसीमने ३२ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. तर आर्यन लाकडाने नाबाद ६३ धावांची खेळी केली. यूएईने ७ गडी बाद १६६ धावा केल्या होत्या. या धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानला १५५ धावा करता आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.