David Warner Retirement : ऑस्ट्रेलिया संघाला नवीन वर्षात धक्का; डेव्हिड वॉर्नरची कसोटी-वनडेमधून निवृत्तीची घोषणा

David Warner Retirement News : डेव्हिड वॉर्नरने 2011 मध्ये ब्रिस्बेनमधील न्यूझीलंडविरुद्ध कसोटी कारकीर्दीला सुरूवात केली. तर 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय कारकीर्दिची सुरुवात केली.
David Warner Retirement News
David Warner Retirement NewsSaam TV
Published On

David Warner News :

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कसोटी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 3 जानेवारीपासून सिडनी येथे पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणारा सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही वॉर्नरच्या ODI मधून निवृत्तीची पुष्टी केली आहे. सोमवारी सिडनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्नर भावूक झाला आणि म्हणाला की, मी एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत आहे.

भारतात वनडे विश्वचषक जिंकणे ही मोठी कामगिरी आहे. त्यामुळे मी आज त्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे मला जगभरातील इतर लीगमध्ये खेळता येतील. चॅम्पियन्स ट्रॉफी येत आहे हे मला माहीत आहे. जर मी दोन वर्षात चांगले क्रिकेट खेळत असेल आणि संघाला गरज असेल तर मी उपलब्ध असेन, असंही डेव्हिड वॉर्नरने म्हटलं. (Latest News)

David Warner Retirement News
IND vs SA: केपटाऊन विजयासाठी टीम इंडियाची जोरदार तयारी; मालिका वाचवण्यासाठी कंबर कसली

वॉर्नरने टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वनडे आणि टेस्टमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असू शकतो.

पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर तो बिग बॅशमध्ये सिडनी थंडरसाठी किमान चार सामने खेळणार आहे. यानंतर तो ILT20 मध्ये दुबई कॅपिटल्सकडून खेळू शकतो. ILT20 लीगमध्ये खेळण्यासाठी त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून NOC मागितली आहे. ज्यामध्ये दुबई संघाचा पहिला सामना 21 जानेवारी रोजी होणार आहे.

कसोटी कारकीर्द

डेव्हिड वॉर्नरने 2011 मध्ये ब्रिस्बेनमधील न्यूझीलंडविरुद्ध कसोटी कारकीर्दीला सुरूवात केली. 111 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 44.58 च्या सरासरीने 8695 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 26 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे.

David Warner Retirement News
INDW vs AUSW: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात मोठी दुर्घटना, भरमैदानातून खेळाडूला थेट रुग्णालयात नेलं; नेमकं काय घडलं?

वनडे कारकीर्द

वॉर्नरने 2009 मध्ये एकदिवसीय कारकीर्दिची सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होवर्टमध्ये त्याने पहिला सामना खेळला होता. त्याने 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये विश्वचषक स्पर्धेतील शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. 161 सामन्यामध्ये त्याने 45.30 च्या सरासरीने 6932 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 22 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com