INDW vs AUSW: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात मोठी दुर्घटना, भरमैदानातून खेळाडूला थेट रुग्णालयात नेलं; नेमकं काय घडलं?

Sneh Rana Injured in Live Match: स्नेह राणाला क्षेत्ररक्षण करताना तिला दुसऱ्या खेळाडूची डोक्याला टक्कर लागली. या घटनेत डोक्याला जबर मार लागल्याने स्नेहला मैदानातच चक्कर येऊ लागल्या.
Sneh Rana
Sneh RanaTwitter
Published On

INDW vs AUSW:

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात एक खेळाडू गंभीर जखमी झाला आहे. स्नेह राणाला क्षेत्ररक्षण करताना तिला दुसऱ्या खेळाडूची डोक्याला टक्कर लागली. या घटनेत डोक्याला जबर मार लागल्याने स्नेहला मैदानातच चक्कर येऊ लागल्या. त्यानंतर स्नेह राणाची थेट रुग्णालयात रवानगी करण्यात आली. स्नेह राणाच्या डोक्यावर जबर मार लागल्याने पुढील सामने खेळता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

बीसीसीआयने स्नेह राणाच्या दुखापतीबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. राणा फिल्डिंग करताना दुखापतग्रस्त झाली. राणा दुखापतग्रस्त झाल्यानंतर मैदानाच्या बाहेर गेली. त्यानंतर काही वेळाने पुन्हा मैदानात परतली. तिने सामन्यात गोलंदाजी देखील केली. मात्र, फिल्डिंग करताना तिला डोकेदुखी सुरु झाली. त्यामुळे ती पुन्हा मैदानाबाहेर गेली. तिच्या जागी सामन्यात हरलीनला संघात सहभागी केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sneh Rana
Vinesh Phogat Returned Arjuna Award: 'असा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये...', कुस्तीपटू विनेश फोगटने अर्जुन पुरस्कार सोडला कर्तव्य पथावर

या षटकात घडली दुर्घटना

श्रेयांका पाटील ऑस्ट्रेलियाच्या विरोधात २५ वे षटक टाकत होती. बेथ मुनीने चेंडू हवेत फटकावला. बेथने फटकावलेला चेंडू झेलण्यासाठी स्नेह आणि पूजा धावली. हा झेल घेताना दोघी एकमेकांना धडकल्या.

या घटनेत स्नेह राणा दुखापतग्रस्त झाली. त्यानंतर तिला मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्यानंतर पुन्हा ३३ व्या षटाकात गोलंदाजी करण्यासाठी आली. राणाने सामन्यात १० षटक टाकले. तिने १० षटकात ५९ धावा दिल्या.

Sneh Rana
IND vs SA: पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक हादरा! संघातील हुकमी एक्का दुसऱ्या सामन्यातून बाहेर?

टीम इंडियाने ३ धावांनी सामना गमावला

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मालिकेचा दुसरा सामना झाला. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया महिला संघाने अवघ्या ३ धावांनी सामना गमावला.  या सामन्यात भारताच्या लेकी जिंकता जिंकता हरल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com