Viral Video : खेळाडू खांद्यावर हात ठेवून नेमकी काय चर्चा करत असतील? 'हा' VIDEO पाहून येईल अंदाज

Funny Cricket Video: सध्या सोशल मीडियावर युवा खेळाडूंचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
team india
team indiasaam tv news
Published On

Cricket Team Hurdle Funny Video:

क्रिकेटमध्ये प्लानिंग अतिशय महत्वाच असतं. प्लानिंगशिवाय ना तुम्ही फलंदाजाला बाद करू शतक. ना धावा करुन मोठी धावसंख्या उभारु शकता. प्लानिंगमध्ये कर्णधाराची आणि संघातील प्रमुख किंवा अनुभवी खेळाडूची भूमिका अतिशय महत्वाची असते. सामना सुरु होण्यापूर्वी सर्व खेळाडू एकत्र येतात आणि पुढे काय करायचं याचं प्लानिंग करतात. अशाच एका संघाचा प्लानिंग करत असतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

क्रिकेटमध्ये जेव्हा खेळाडू एकत्र येऊन प्लानिंग करतात. या प्रोसेसला हर्डल असं म्हणतात.सामना किंवा डाव सुरु होण्यापूर्वी कर्णधार आपल्या खेळाडूंना एकत्र आणतो आणि गोल करुन मैदानात जाऊन नेमकं काय करायचंय याचं प्लानिंग केलं जातं. आता तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की, नेमंक खेळाडू प्लानिंग करताना काय चर्चा करत असतील? या प्रश्नाचं उत्तर देणारा मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.

team india
IND vs SA: केपटाऊन विजयासाठी टीम इंडियाची जोरदार तयारी; मालिका वाचवण्यासाठी कंबर कसली

व्हिडिओ होतोय व्हायरल..

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,संघाचा कर्णधार हर्डलला लिड करताना दिसून येतोय. तो म्हणतोय की, संपूर्ण संघाने स्लेज करायचं. जो कोणी २ वेळा मिस फिल्ड करेल त्याची जागा बदलली जाईल तर ३ वेळा मिसफिल्ड करणाऱ्याला बाहेर बसवलं जाईल. (Latest sports updates)

सर्व स्लेजिंग करतील कोणीच मिसफिल्ड करणार नाही. कुठल्याही गोलंदाजाने मला गोलंदाजी द्या असं म्हणू नका. बॉलला नेहमी शाईन करणं सुरु ठेवा.' हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही लहान मुलं शालेय संघाचा भाग असावे. मात्र या शाळकरी खेळाडूचं क्रिकेटचं ज्ञाण जबरदस्त आहे. कर्णधारही आक्रमक असल्याचं दिसून येत आहे. त्याने सुरुवातीपासूनच खेळाडूंना स्लेजिंग करायला सांगितलं आहे. यावरुन तो आक्रमक कर्णधार आहे. असं दिसून येत आहे.

team india
IND vs SA: पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक हादरा! संघातील हुकमी एक्का दुसऱ्या सामन्यातून बाहेर?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com