Ind vs pak Saam Tv
Sports

Champions Trophy : ...आणि यांना चॅम्पियन बनायचंय! पहिल्यांदाच यजमानपद मिळालं अन् दुसऱ्या सामन्यात बाहेर पडले, पाकिस्तानची स्पर्धेतून एक्झिट

Ind vs Pak : आज भारत विरुद्ध पाकिस्तानच्या महामुकाबल्यात भारताचा ऐतिहासिक विजय झाला आहे. भारताने ६ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला आहे. यामुळे पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यजमान पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा न्यूझीलंडने ६० धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने ६ गडी राखत पाकिस्तानच्या संघावर विजय मिळवला. दोन्ही सामन्यात पाकिस्तानचा पराजय झाला आहे. यामुळे पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधला पाकिस्तानचा पहिला सामना न्यूझीलंडच्या विरुद्ध होता. या सामन्यात पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडच्या गोलंदाजीपुढे ढेर झाला. मायभूमीत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा मोठा पराभव झाला. त्यानंतर आज भारताच्या विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला खेळला गेला. या सामन्यामध्येही पाकिस्तानला पराजयाला सामोरे जावे लागले.

आज दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये टॉस जिंकत पाकिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या खेळाडूंनी २४१ धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा संघ मैदानात उतरला. कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला. पण विराट कोहली आणि शुबमन गिलने चांगली भागीदारी केली. पुढे त्याला गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरची साथ मिळाली. एकूणच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीमध्ये भारत पाकिस्तानवर वरचढ ठरला.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पहिल्यांदाच हा मान पाकिस्तानला देण्यात आला होता. पण याच वेळी त्यांनी लाजिरवाणी कामगिरी केली. यजमान असूनही ते दोन्ही सामने हरले. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीमधून एक्झिट झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यजमानांनी हा लाजिरवाणा रेकॉर्ड केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT