IND vs Pak सामनादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा; पाकिस्तानच्या कर्णधाराचा भारतीय बॉलरला धक्का, नेमकं काय घडलं?

IND VS PAK Video : भारत पाकिस्तान सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या कर्णधाराने भारतीय गोलंदाजाला धक्का दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Ind Vs Pak
Ind Vs Pak Saam Tv
Published On

Ind Vs Pak Match : चॅम्पियन्स ट्रॉफीतला भारत-पाकिस्तान सामना सुरु आहे. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत २४१ धावा केल्या. या हायवॉल्टेज सामन्यातला एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यात पाकिस्तानच्या कर्णधाराने भारतीय गोलंदाज हर्षित राणाला धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानचा संघ फलंदाजी करत असताना २१ व्या षटकात हर्षित राणा गोलंदाजी करत होता. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने स्टोक खेळला. धाव घेण्यासाठी रिझवान जोरात धावला. धावताना त्याने राणाला जोरदार धक्का दिला. दोन्ही खेळाडू एकमेकांवर आदळले. त्यानंतर हर्षित राणा दोन्ही हात पसरवून रिझवानला काहीतरी म्हणाला. तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलामीवीरांनी पाकिस्तानला ठिकठाक सुरुवात करुन दिली होती. मोहम्मद रिझवान आणि सउद शकीलने खेळ सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण पुढे चार गडी बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ ढेपाळला. पाकिस्तानच्या संघाने भारतासमोर २४१ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघ हे आव्हान पूर्ण करणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Ind Vs Pak
Hardik Pandya GF : हार्दिक भाऊचा नाद करायचा नाय! भारत-पाकिस्तान सामन्यात दिसली पंड्याची नवी गर्लफ्रेंड, फोटो व्हायरल

भारत-पाकिस्तान सामना नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी ठरत आला आहे. या सामन्यामध्ये एकमेकांवर छोट्या-मोठ्या कुरघोडी होत असतात. दोन्ही संघ एकमेकांकडे दौरे करत नसल्याने भारत-पाकिस्तान सामने दुर्मिळ असतात. त्यामुळे या सामन्यांची क्रिकेटचे चाहते वाट पाहत असतात. आजचा सामना कोण जिंकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Ind Vs Pak
Ind vs Pak : भारताला हरवण्यासाठी जादूटोणा? रिझवानचा तो फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी घेतली मजा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com