babar azam google
Sports

IND vs PAK: 'भीती तर वाटणारच ना..', भारत- पाकिस्तान सामन्याआधीच बाबर आझम टेन्शनमध्ये

India vs Pakistan, Babar Azam News In Marathi: भारत-पाकिस्तान हा सामना ९ जून रोजी होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी बाबर आझमने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. यजमान अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्याने या स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. भारतीय संघ ५ जून रोजी आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ९ जून रोजी भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पार पडणार आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजर राहणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम टेन्शनमध्ये असल्याचं दिसून येत आहे.

भारत- पाकिस्तान सामन्यापूर्वी काय म्हणाला बाबर आझम?

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना अॅक्शनपॅक सामना पाहायला मिळत असतो. २०२२ मध्ये जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी शेवटच्या चेंडूवर निकाल लागला होता. बाबर आझम या सामन्यापूर्वी टेन्शनमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

बाबर आझम घाबरला तर आहे, मात्र भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी त्याने प्लानही सांगितला आहे. तो म्हणाला की, ' खेळातील बेसिक गोष्टी फॉलो करणं हा प्रेशरमधून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.' या सामन्यापूर्वी बेसिक गोष्टी आणि स्किल्सवर काम करणार असल्याचं बाबर आझमने म्हटलं आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. नेहमी भारताचा संघ पाकिस्तानवर भारी पडला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी दोन्ही संघांचा ग्रुप ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही संघ ९ जून रोजी आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ७ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ५ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर १ सामना अनिर्णित राहिला आहे आणि एका सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

Maharashtra Live News Update: धुळे जिल्ह्यासह जवळच्या जिल्ह्यांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Mumbai To Rajgad Travel: मुंबईपासून राजगड किल्ल्यापर्यंत प्रवास कसा करावा? ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल टिप्स जाणून घ्या

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT