T20 World Cup 2024: २९ दिवस, २० संघ अन् ५५ सामने.. उद्यापासून T20 वर्ल्डकपचा थरार; संपूर्ण शेड्यूल पाहा एका क्लिकवर

T20 World Cup 2024 Schedule Details: उद्यापासून टी ट्वेंटी विश्वचषकाचा थरार सुरू होणार आहे. २० संघांमध्ये २९ दिवस विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्यासाठी लढती होणार आहेत.
T20 World Cup 2024: २९ दिवस, २० संघ अन् ५५ सामने.. उद्यापासून T20 विश्वचषकाचा थरार; संपूर्ण शेड्युल वाचा एका क्लिकवर
ipl over now t20 world cup will kick start from 1 june know team india schedule cricket news in marathi amd2000twitter

इंडियन प्रिमियर लीगची (आयपीएल) स्पर्धा संपल्यानंतर आता क्रिडा विश्वात टी- ट्वेंटी विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये स्पर्धेतील पहिला सामना उद्या २ जूनला होणार आहे. विश्वचषकाचे आयोजन पहिल्यांदाच अमेरिकेने केले असून २९ दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. जाणून घ्या या विश्वचषकाबद्दलची सविस्तर माहिती.

उद्यापासून टी ट्वेंटी विश्वचषकाचा थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका, पश्चिम इंडीज, आयर्लंड, नामीबिया, ओमान, पापुआ न्यू न्यू यासह एकूण २० संघ खेळतील. १ जूनपासून या स्पर्धेला वेस्ट इंडिज-अमेरिकेमध्ये सुरुवात होणार आहे. तर २९ जून रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

असे असतील टीम इंडियाचे सामने!

भारतीय संघ ‘अ’ गटात असून त्यात अमेरिका, पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा हे संघ आहेत. विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध असेल. त्यानंतर ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये हायहोल्टेज लढत होईल. त्यानंतर १२ जून रोजी भारत विरुद्ध युएसईचा सामना असेल. तर १५ जून रोजी भारत विरुद्ध कॅनडामध्ये सामना होईल. हे सर्व सामने रात्री ८ वाजता सुरू होतील.

T20 World Cup 2024: २९ दिवस, २० संघ अन् ५५ सामने.. उद्यापासून T20 विश्वचषकाचा थरार; संपूर्ण शेड्युल वाचा एका क्लिकवर
ICC T20 World Cup 2024: टी -२० वर्ल्डकप विजेता संघ होणार कोट्यवधी! तर उपविजेत्या संघावरही पडणार पैशांचा पाऊस

या ठिकाणी होतील सामने

ICC T20 विश्वचषक 2024 चे सामने यूएसए आणि वेस्ट इंडिजमघील एकूण 9 शहरांमध्ये होणार आहेत, ज्यात न्यूयॉर्क, डॅलस, टेक्सास, फ्लोरिडा, गयाना, बार्बाडोस, सेंट लुसिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि किंग्स्टन या ठिकाणांचा समावेश आहे.

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र, चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

T20 World Cup 2024: २९ दिवस, २० संघ अन् ५५ सामने.. उद्यापासून T20 विश्वचषकाचा थरार; संपूर्ण शेड्युल वाचा एका क्लिकवर
IND vs BAN Warm-up Match: T20 विश्वचषकाची रंगीत तालीम! टीम इंडियाचा आज बांग्लादेशविरुद्ध सराव सामना; पाऊस खेळ बिघडवणार? असं असेल हवामान...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com