IND vs BAN Warm-up Match: T20 विश्वचषकाची रंगीत तालीम! टीम इंडियाचा आज बांग्लादेशविरुद्ध सराव सामना; पाऊस खेळ बिघडवणार? असं असेल हवामान...
India vs Bangladesh Warm Up Match: Saamtv

IND vs BAN Warm-up Match: T20 विश्वचषकाची रंगीत तालीम! टीम इंडियाचा आज बांग्लादेशविरुद्ध सराव सामना; पाऊस खेळ बिघडवणार? असं असेल हवामान...

India vs Bangladesh Warm Up Match: आयपीएल संपवून टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धसाठी टीम इंडियाचा संघ सज्ज झाला आहे. आज भारतीय संघाचा सराव सामना बांग्लादेशविरुद्ध होणार आहे.

आयपीएलचा थरार संपल्यानंतर आता क्रिडा विश्वात टी- ट्वेंटी विश्वचषकाचा रणसंग्राम सुरू होणार आहे. टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघ आज अमेरिकेत पोहोचला असून आज टीम इंडियाचा पहिला सराव सामना आहे. न्यूयॉर्कमधील काउंटी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात हा सामना होणार आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तान तसेच अमेरिकेसोबत लढत होईल. हे तिन्ही सामने नासाऊ काउंटीमध्ये बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जातील. या स्टेडियममध्ये ड्रॉप-इन खेळपट्ट्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळेच आज भारतीय संघाचा बांग्लादेशविरुद्धचा सराव सामना महत्वाचा असेल.

असे असेल हवामान!

टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यापासून एक-दोनदा पावसाचा सामना केला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही पाऊस खेळ बिघडवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. दिलासा देणारी बाब म्हणजे न्यूयॉर्कमधील हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल आणि त्यावेळी आकाश सूर्यप्रकाशित असेल, त्यामुळे सामना वेळेवर सुरू होणे आणि पूर्ण होणे अपेक्षित आहे.

IND vs BAN Warm-up Match: T20 विश्वचषकाची रंगीत तालीम! टीम इंडियाचा आज बांग्लादेशविरुद्ध सराव सामना; पाऊस खेळ बिघडवणार? असं असेल हवामान...
ICC T20 World Cup 2024: टी -२० वर्ल्डकप विजेता संघ होणार कोट्यवधी! तर उपविजेत्या संघावरही पडणार पैशांचा पाऊस

टीम इंडियाने जानेवारीपासून एकही T20 सामना खेळला नसला तरी सर्व भारतीय खेळाडू आयपीएल 2024 मध्ये वेगवेगळ्या संघांसोबत व्यस्त होते. ज्याचा फायदा भारतीय संघाला होईल, त्यामुळे आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असेल? याकडे सर्वांच्या नजरा असतील. तसेच विराट कोहली आजच्या सामन्यात खेळणार का? हे पाहावे लागेल.

IND vs BAN Warm-up Match: T20 विश्वचषकाची रंगीत तालीम! टीम इंडियाचा आज बांग्लादेशविरुद्ध सराव सामना; पाऊस खेळ बिघडवणार? असं असेल हवामान...
T20 Worls Cup: फ्लाईट मिस झाल्याने खेळाडू थेट संघाबाहेर; क्रिकेट बोर्डाचा कठोर निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com