T20 Worls Cup: फ्लाईट मिस झाल्याने खेळाडू थेट संघाबाहेर; क्रिकेट बोर्डाचा कठोर निर्णय

वेस्ट इंडिजच्या संघात शिमरॉन हेटमायरला फलंदाज शामर ब्रूक्सच्या जागी स्थान देण्यात आले आहे.
T 20 World CUp
T 20 World CUpSaam TV
Published On

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकाला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. क्रिकेटमधील मोठ्या स्पर्धेआधी अनेक खेळाडू दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत असून विश्वचषकाचा भाग होण्यासाठी मेहनत घेत आहेत. तर काही खेळाडू विश्वचषकापूर्वीच दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मात्र, वेस्ट इंडिज क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांचा एक खेळाडू एका वेगळ्याच कारणामुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

संघाचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे, पण त्याला दुखापत झाली नाही. फ्लाइट मिस झाल्यामुळे बोर्डाने कठोर निर्णय घेत त्याला टी-20 वर्ल्ड कप संघातून वगळले आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुषांच्या T20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजच्या संघात शिमरॉन हेटमायरला फलंदाज शामर ब्रूक्सच्या जागी स्थान देण्यात आले आहे. मंडळाने सोमवारी ही घोषणा केली.

T 20 World CUp
T20 World Cup मधून बाहेर गेल्यानंतर जसप्रीत बुमराह दुःखी; काय दिली पहिली प्रतिक्रिया?

बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, "शिमरॉन हेटमायरने ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी त्याची रिशेड्युल फ्लाइट चुकवल्यानंतर CWI निवड समितीने निर्णय घेतला होता. हेटमायर विनंतीनुसार शनिवार 1 ऑक्टोबरला फ्लाईट रिशेड्युल करण्यात आली होती.

त्यानंतर निवड समितीने एकमताने शिमरॉन हेटमायरच्या जागी शामराह ब्रूक्सला T20 विश्वचषक संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे क्रिकेट वेस्ट इंडिजचे क्रिकेट संचालक जिमी अॅडम्स यांनी सांगितलं.

T 20 World CUp
India vs South Africa : मालिकेच्या अखेरच्या टी२० सामन्यात भारत पराभूत; दक्षिण आफ्रिकेने ४९ धावांनी जिंकला सामना

कौटुंबिक कारणास्तव आम्ही शिमरॉनची फ्लाइट शनिवार ते सोमवार बदलली. ती फ्लाईल देखील मिस झाल्याने आम्हाला त्याच्या दुसऱ्या खेळाडूची निवड करण्याशिवाय पर्याय नाही. अत्यंत महत्त्वाच्या जागतिक स्पर्धेसाठीच्या संघाबाबत कोणतीही तडजोड आम्ही करु शकत नाही, असं जिमी अॅडम्स यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com