T20 World Cup मधून बाहेर गेल्यानंतर जसप्रीत बुमराह दुःखी; काय दिली पहिली प्रतिक्रिया?

जसप्रीत बुमराह टी २० वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आता संघात त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार?
Jasprit Bumrah News/Twitter
Jasprit Bumrah News/TwitterSAAM TV
Published On

Jasprit Bumrah News : भारताचा तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराह टी २० वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता संघात त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टी २० वर्ल्डकपसारख्या (T20 World Cup) महत्वाच्या स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बुमराहनं दिलेल्या प्रतिक्रियेमधून तो नक्कीच निराश आहे, हे दिसून येते. (Tajya Batmya)

Jasprit Bumrah News/Twitter
शेवटी टीम इंडियासाठी वाईट बातमी आलीच; जसप्रीत बुमराह T20 वर्ल्डकपमधून 'आऊट'

टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांची डेथ ओव्हरमध्ये चांगली कामगिरी होत नाही. ही समस्या टीम इंडियाला भेडसावत असतानाच जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळं वर्ल्डकप स्पर्धा खेळू शकणार नाही. बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतर आता स्वतः जसप्रीत बुमराहनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Jasprit Bumrah News/Twitter
ICC T20 World Cup Prize Money : पैसाच पैसा! टी-२० वर्ल्डकप संघांना करणार मालामाल

जसप्रीत बुमराहने ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. या वर्षी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा खेळू शकणार नाही याचं दुःख होत आहे. मात्र, ज्यांच्याकडून मला खूप सारं प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे, त्यांचे आभार मानतो. दुखापतीतून सावरतानाच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न असेल, असे बुमराहने म्हटले आहे.

बुमराहच्या जागी कोण?

जसप्रीत बुमराह टी २० वर्ल्डकप स्पर्धा खेळू शकणार नाही. आता त्याच्या जागी संघात कुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता आहे. जसप्रीत बुमराह संघाबाहेर गेल्यामुळे टीम इंडियाची मोठी अडचण झाली आहे. टीम इंडियाकडे बुमराहला पर्याय म्हणून मोहम्मद शमी, दीपक चाहर, मोहम्मद सिराज हे तीन गोलंदाज आहेत. मात्र, या तिघांपैकी नेमकी कुणाला संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com