ICC T-20 Ranking: टी-२० वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज! ICC ने दिली मोठी अपडेट

ICC T-20 Rankings News In Marathi: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आयसीसीने मोठी अपडेट दिली आहे.
ICC T-20 Ranking: टी-२० वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज! ICC ने दिली मोठी अपडेट
team indiagoogle
Published On

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा तोंडावर असताना भारतीय संघाने आयसीसीच्या टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. भारतीय संघ २६४ रेटिंग पॉईंट्ससह अव्वल स्थानी आहे. तर दोन वेळेस जेतेपदावर नाव कोरणारा वेस्टइंडिजचा संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. २५७ रेटिंग पॉईंट्ससह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी तर २५४ रेटिंग पॉईंट्ससह इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ सातव्या स्थानी सरकला आहे. तर २५० रेटिंग पॉईंट्ससह न्यूझीलंडचा संघ दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानपेक्षाही पुढे आहे. वेस्टइंडिज संघाने देशांतर्गत टी-२० मालिकांमध्ये शानदार कामगिरी केली. या खेळीचं फळ म्हणून वेस्टइंडिजला आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे.

ICC T-20 Ranking: टी-२० वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज! ICC ने दिली मोठी अपडेट
IPL 2024 Final: सारखा स्कोर सारखं चेज! IPLच्या दोन फायनल स्क्रिप्टेड की योगायोग?

भारतीय संघाचा सामना कधी?

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर बहुप्रतिक्षित भारत- पाकिस्तान सामना ९ जून रोजी खेळला जाणार आहे. भारतीय संघाचे पुढील २ सामने १२ जून रोजी अमेरिका आणि १५ जून रोजी कॅनडासोबत होणार आहे.

ICC T-20 Ranking: टी-२० वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज! ICC ने दिली मोठी अपडेट
IPL 2024 Playing XI: IPL 2024 स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग 11! तुम्हाला काय वाटतं?

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं पहिलं हंगाम २००७ मध्ये खेळवलं गेलं होतं. या हंगामात भारतीय संघाने शानदार खेळ करत फायनलमध्ये पाकिस्तानला धुळ चारली आणि शानदार विजय मिळवला होता. त्यानंतर १७ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र अजूनही भारतीय संघाला विजय मिळवता आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com