NZ vs SA: ९२ वर्षांची प्रतीक्षा संपली! न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर २-० ने ऐतिहासिक विजय

New zealand vs South Africa Test Series: दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत न्यूझीलंड संघाने दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ करत मालिकेत २-० ने विजय मिळवला आहे.
new zealand cricket team
new zealand cricket teamtwitter
Published On

New zealand vs South Africa Test Series:

दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत टीम साऊदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाने दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ करत मालिकेत २-० ने विजय मिळवला आहे.

हा विजय न्यूझीलंड संघासाठी ऐतिहासिक आहे. कारण ९२ वर्ष आणि १८ कसोटी मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्यांदाच न्यूझीलंडला पराभूत केलं आहे. हा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात केन विलियमसन आणि ओ रुर्के यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

हेमिल्टनच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी २६७ धावांची गरज होती. न्यूझीलंडने या धावांचा यशस्वी पाठलाग केला. मुख्य बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना न्यूझीलंडने कधीच २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. यावेळी त्यांनी हा रेकॉर्डही मोडून काढला आहे. न्यूझीलंडने २५० धावांचा पाठलाग करताना मिळवलेला हा चौथा विजय आहे. न्यूझीलंडने यापूर्वी बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध खेळतानाही करुन दाखवला आहे. (Cricket news in marathi)

new zealand cricket team
Sarfaraz Khan Father : 'सरफराजला सांभाळून घ्या..', वडिलांनी भावनिक साद घालताच रोहितने दिलं मन जिंकणारं उत्तर

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २४२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला न्यूझीलंडचा डाव अवघ्या २११ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात ३१ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २३५ धावा केल्या.

new zealand cricket team
Sarfaraz Khan Statement: जडेजाच्या चुकीमुळे रनआऊट झाल्यानंतर सरफराज खानची पहिली प्रतिक्रिया,म्हणाला...

यासह दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला विजयासाठी २६७ धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना केन विलियम्सनने कारकिर्दीतील ३२ वे शतक झळकावले. यासह तो कसोटीतील चौथ्या डावात ५ शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. यासह न्यूझीलंड संघासाठी धावांचा पाठलाग करताना नाबाद शतकी खेळी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com